
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ डॉ. राजेश इंगोले यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने वैद्यकीय कक्षाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून या नियुक्तीचे पत्र त्यांना नुकत्याच देवडी या ठिकाणी संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण व पत्रकारांच्या गुण गौरव सोहळ्या निमित्य आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले. या निवडी बद्दल डॉक्टर राजेश इंगोले यांचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
डॉक्टर राजेश इंगोले हे गेली अनेक वर्षापासून इंडियन मेडिकल असोसिएशन या राज्यस्तरीय संघटनेचे क्रियाशील पदाधिकारी असून या संघटनेच्या माध्यमातून त्यांचा राज्यभर संपर्क निर्माण झालेला आहे आणि त्यामुळेच मागील अनेक वर्षापासून त्यांचा केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, धार्मिक सामाजिक क्षेत्रात सतत सहभाग असतो.
याच सामाजिक कार्यामुळे त्यांची मागील पाच वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी परिषदेशी नाळ जुळली आणि मराठी पत्रकार परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून ते अंबाजोगाई तालुक्यातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी सातत्याने घेत आहेत.
वैद्यकीय कक्ष प्रमुख म्हणून मराठी पत्रकार परिषदेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात डॉक्टर राजेश इंगोले यांची महत्त्वाची भूमिका सातत्याने राहिलेली आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक पत्रकारांच्या आजाराचे निदान लागल्यामुळे या आजारा संदर्भात काळजी घेणे साठी डॉक्टर इंगोले हे सातत्याने सल्ला देत असतात.
डॉक्टर राजेश इंगोले यांच्या कार्याचे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी सातत्याने कौतुक केले असून डॉक्टर इंगोले यांनी मराठी पत्रकार परिषदेसाठी राज्यभर काम करावे असा त्यांचा वारंवार आग्रह होता आणि त्यामुळेच नुकत्याच वडवणी धातू तालुक्यातील देवडी या ठिकाणी झालेल्या पुरस्कार वितरण व पत्रकारांच्या गुणगौरव सोहळ्यात डॉक्टर राजेश इंगोले यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वैद्यकीय कक्षाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे, मा. पद्मश्री पोपटराव पवार, मा. श्री. एस.एम.देशमुख मुख्य विश्वस्त, मा. श्री. मिलिंद अष्टीवकर अध्यक्ष, अ.भा. म. प. मा. दिलीप सपाटे
(अध्यक्ष मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघ), ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब यांच्या हस्ते डॉक्टर राजेश इंगोले यांना हे नियुक्तीपत्र देऊन त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉक्टर राजेश इंगोले यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
