0


नवी दिल्ली : आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोपिंगमध्ये अपयशी ठरलेल्या कुस्तीपटू नरसिंग यादव प्रकरणात लक्ष घातले आहे.
उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी भारताचा कुस्तीपट्टू नरसिंग यादव दोषी आढळल्यावर आता त्याची रिओ वारी धोक्यात आली आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः याप्रकरणी लक्ष घातल्याने नरसिंगला अजूनही ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत. पंतप्रधानांनी स्वतः पक्षाच्या बैठकीत याविषयी चर्चा केल्याचे आज कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण यांनी सांगितले. आता पंतप्रधानांनी स्वतः लक्ष घातल्याने याची लवकरात लवकर चौकशी होऊन उद्या होणाऱ्या वाडा समोरच्या सुनावणीत नरसिंगच्या ष़डयंत्राच्या दाव्याला पुष्टी मिळेल असेही बृजभूषण यांनी म्हटले आहे. दरम्यान, नरसिंग यादवने आपण उत्तेजक द्रव्यांचे सेवन केले नसून हे आपल्याविरुद्ध षडयंत्र असल्याचा दावा केला आहे.
आता, नरसिंगच्या या दाव्यांना राज्यातल्या विरोधीपक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने नरसिंग यादवच्या पाठिशी उभं राहून त्याला रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्यासाठी मदत करावी अशी मागणी विधानसभेतले विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील नरसिंग यादवच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

Post a Comment

 
Top