0
नवी दिल्ली: रोज नवे खुलासे झाकीर नाईकवर धर्मांतराच्या प्रकरणात होत असून आता एका नव्या खुलाशानुसार, धर्मांतरासाठी झाकीर नाईकच्या संस्थेकडून ५०,००० दिले जात असल्याचे समोर येत आहे.
देशातील धर्मांतराची मोहीम राबवणारे एक केंद्र म्हणून झाकीर नाईक संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन उदयाला येत होते. सध्या जवळपास ८०० नागरिकांचे झाकीर नाईकच्या संस्थेने धर्मांतर घडवून आणल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. धर्मांतराची मोहीम झाकीर नाईकचा सहकारी आर्शी कुरेशी आणि रिझवान खान हे दोघे राबवत असल्याचा आरोप होत आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेकजण झाकीरच्या भाषणाने प्रभावित होऊन झाकीर नाईकची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनशी संपर्क करत होते. त्यावेळी कुरेशी हा त्यांना मुंबईत बोलावत असे, तर रिझवान त्यांना पनवेलला उतरवून त्यांची राहण्याची आणि धर्मांतराची सर्व प्रक्रिया पूर्ण करीत असे. याबद्ल्यात रिझवान झाकीर नाईकच्या संस्थेकडून पैसे घेत असल्याचे समोर येत आहे.
झाकीर नाईकच्या संस्थेला या कामासाठी सौदी अरेबियाकडून रसद मिळत असल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे हे धर्मांतर केलेल्या नागरिकांचे पुढे काय होत होते, याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

Post a Comment

 
Top