0
बीड  ( महाराष्ट्र वार्ता ) -  राजकीय पक्षाचा अधिकृत उमेदवार असल्याची सिद्धता करणारे ’ नमुना-२ (ब)’ हे पत्र आता उमेदवारी अर्जासोबतच दाखल करावे लागणार आहे. पूर्वी छाननीच्या दिवसापर्यंत हे नमुनापत्र सादर करण्याची मुभा उमेदवारांना होती. तथापि, नियमात
राज्यातील एकूण २५ जिल्हा परिषद व २८३ पंचायत समितींच्या निवडणुकांचा कार्यक्रम ११ जानेवारीला जाहीर झाला आहे. विविध राजकीय पक्षांद्वारे अधिकृत उमेदवारांना पक्षाचे निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी विहित नमुन्यात पत्र देण्यात येते. त्याला नमुना २ (ब) पत्र असे संबोधतात. हे पत्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या म्हणजेच छाननीच्या तारखेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याची मुभा उमेदवारांना होती. ग्रामविकास विभागाने काढलेल्या व शासनाद्वारे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार आता हे पत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या तारखेस दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे बंधनकारक झाले आहे. राजकीय पक्षांना उमेदवारी यादी प्रसिद्ध करून उमेदवारांना नमुना २ (ब) देण्याची घाई करावी लागणार आहे.
पहिल्या टप्प्यात १५ जिल्हा परिषद व १६५ पंचायत समितींसाठी निवडणुका होतील. त्यासाठी १ फेब्रुवारीला नमुना पत्र सादर करता येईल. दुसऱ्या टप्प्यातील ११ जिल्हा परिषद आणि ११८ पंचायत समितींसाठी ६ फेबु्रवारीला नमुना पत्र देणे अनिवार्य आहे. नमुना पत्र न दिल्यास उमेदवार अपक्ष मानण्यात येईल.
उमेदवाराने अर्जात तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे, त्याचा उल्लेख केला नसेल व त्यास एखाद्या पक्षाचा नमुना २ (ब) प्राप्त झाला, तरी तो पक्षाचा अधिकृत उमेदवार राहणार नाही.उमेदवाराने अर्जात जरी तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असल्याचा उल्लेख केला, तथापि त्यास पक्षाने नमुना २ (ब) दिला नाही, तर तो पक्षाचा अधिकृत उमेदवार ठरणार नाही. 
करण्यात आलेल्या ताज्या बदलानंतर उमेदवारांनी आणि पक्षांची धावपळ वाढणार आहे.

Post a Comment

 
Top