कोल्हापूर ( महाराष्ट्र वार्ता ) - राष्ट्रवादी - भाजपची छुपी युती असल्याचा आरोप करणारे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी खरपूस समाचार घेतला. निरुपम हा मुर्ख माणूस असल्याची टीका पवार यांनी बोलताना केल्याने खळबळ उडाली.
राज्याच्या प्रगतीत या माणसाचे योगदान काय ? ज्या पदावर ते आहेत, तेथून पायउतार झाल्यानंतर त्यांची किंमत काय राहणार ? त्यांना कोण विचारणार ? त्यांनी कोल्हापूरसाठी तरी काय केले आहे का ? या शब्दात शरद पवार यांनी निरुपम यांचा समाचार घेतला. निरुपम यांच्या विषयावर पवार चांगलेच भडकले. ते कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महापालिका निवडणुकीत भाजपशी युती न करण्याचा सेनेच्या निर्णयाने राज्य सरकार अस्थिर बनले आहे. या स्थितीत शिवसेना सत्तेत राहणार नाही, ती राहिली तर सत्तेसाठी शिवसेना काहीही करते असा संदेश जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत.

Post a comment