0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - मराठा समाजाच्या वतीने ३१ जानेवारीला सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत राज्यभर चक्का जाम आंदोलन होणार आहे. विविध मागण्यासाठी राज्यभर मराठा क्रांती (मूक) मोर्चा काढण्यात आला होता; परंतु राज्य शासनाने त्या मागण्यांची दखल घेतली नाही. ,यासाठी चक्का जाम आंदोलन घेण्यात येणार आहे.
  जेजुरी येथे छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत पुणे ते पंढरपुर रोडवर रस्ता रोको करून शांततेत  हे आंदोलन होणार आहे, प्रत्येक मराठ्याचे एकच काम... 31 जानेवारीला चक्का जाम..!' असा निर्धार करीत जेजुरी शहरातील सर्व मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन  अजयसिंह सावंत  यांनी केले . हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. आंदोलनाच्या वेळी रुग्णवाहिकासाठी मार्ग मोकळा करून देण्याच्या सूचना स्वयंसेवकांना दिल्या आहेत. राज्यसरकारने मराठा समाजाच्या मागणीची योग्य प्रकारे दखल घ्यावी यासाठी चक्काजाम आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महिला सुद्धा जेजुरीत  मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मराठा समाजाच्या मागण्या शासनाला मान्य कराव्या लागतील, असे संदीप जगताप यांनी सांगितले

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील नराधमांना फाशी मिळावी, "ऍट्रॉसिटी कायद्या'चा गैरवापर रोखावा, तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने राज्य सरकारने अजून कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे मार्चमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चा मुंबईत धडकेल. त्यापूर्वी मंगळवारी राज्यभर चक्‍का जाम आंदोलन करण्यात येणार आहे मराठा समाज चक्का जाम करून आपली ताकद सरकारला दाखवून देणार आहेत ,आता पर्यंत राज्यभर झालेले मोर्चे हेशिस्तबद्ध झाले आहेत,  त्यामुळे  चक्का जाम आंदोलनात कुठेही गालबोट लावू न  देता शिस्तबद्ध आंदोलन करा,  गालबोट लावणाऱ्या संशयिताची माहिती पोलिसांना द्यावी  ,तसेच वाहनांवर दगडफेक न करता , वाहनांची हवा सोडू नका , रस्त्यावर टायर पेटवू नका आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आयोजकांनी दिले.

Post a Comment

 
Top