0
अहमदपुर ( प्रतिनिधी ) -  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभाग्रह,मुंबई येथे ग्राम विकास विभाग आयोजीत यशवंत पंचायत राज अभियानाच्या माध्यमातुन अत्युत्कृष्ट काम करणार्या पंचायत राज संस्था आणि गुणवंत अधिकारी व कर्मचारी यांचा गौरव समारंभ संपन्न.
            सदर गौरव सोहळ्यास व्यासपिठावरती राज्याचे राज्यपाल मा.श्री.सी.विद्यासागर राव, मुख्यमंञी मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस ,राज्याच्या ग्राम विकास मंञी.मा.ना.पंकजाताई मुंडे,राज्य ग्राम विकास मंञी मा.ना.श्री.दादाजी भुसे, मुख्य सचिव मा श्री सुमित मलिक, ग्रामविकास सचिव मा श्री असिम गुप्ता, कोकण विभागीय आयुक्त मा श्री प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

* विभागस्तरीय पडताळणी समितीने दिलेल्या अहवालानुसार मूल्यांकन समितीच्या बैठकीत उत्कृष्ट पंचायतराज संस्थांची निवड करण्यात आली आहे. रोख 11लाख रुपये, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन  अहमदपुर पंचायत समितीचा  पारितोषक प्राप्त   अत्युत्कृष्ट पंचायत समिती म्हणुन प्रथम क्रमांक मिळाला त्याबद्दल राज्यपाल,मुख्यमंञी,ग्राम विकास मंञी यांचे शुभ हस्ते पुरस्कार वितरण पंचायत समिती अहमदपुर ला प्रदान करण्यात आला *
*या प्रसंगी पुरस्कार स्विकारताना ,मा आ श्री विनायकरावजी पाटील ,जि प बांधकाम सभापती ,श्री.प्रकाशजी देशमुख,जि प सदस्य श्री अशोक निवृती केंद्रे, पंचायत समिती सभापती अयोध्याताई अशोक केंद्रे,  माजी प स सभापती श्री राघवेंद्र शेळके, पंचायत समिती सदस्य श्री सुनिल तुकाराम जंगापल्ले आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक गुरसळ, तत्कालीन जि प मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिनकर जगदाळे, तत्कालीन गट विकास अधिकारी मा श्री नितीन दाताळ, गटविकास अधिकारी मा श्री नंदकुमार जाधव, सहायक गविअ मा श्री मांजरमकर सुधिश , विस्तार अधिकारी मा श्री प्रदीप बोंबले कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री मुकेश नाईक, श्री साने तानाजी व इतर प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते . ( प्रतिनिधी - सहदेव व्होनाळे )

Post a Comment

 
Top