0
 मुंबई ( प्रतिनिधी ) - राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतचे बार तसंच दारूची दुकानं आजपासून बंद होणार आहेत. हायवेपासून पाचशे मिटरच्या आतले बार, दारूची दुकानं बंद करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय.
सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. पण 20 हजार किंवा त्याहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये महामार्गांपासून दारूची दुकानं 220 मीटरच्या अंतरावर असायला कोर्टाने परवानगी दिलीय.विशेष म्हणजे ज्या हॉटेलमध्ये दारू पुरवली जाते त्यावरही कोर्टाने बंदी घातलीय. त्यामुळे पब, रेस्टॉरंट ह्यांनाही मोठा दणका बसलाय. राज्यात जवळपास 10 हजार हॉटेल्स बारना याचा फटका बसणार आहे , लोकाकडून या निर्णयाचे स्वागत होत असले तरी पूर्णपणे राज्यात दारूबंदी करण्याच्या मागणीला सुद्धा जोर मिळत आहे .

Post a Comment

 
Top