0
केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय संभाजी गायकवाड यांचे आज पासुन  चाकण औद्यगिक वसाहती मध्ये आमरण उपोषण
विविध राजकीय पक्ष, सामाजिक व कामगार संघटना यांचा उत्स्फूर्त पाठिंबा   
  चाकण ( प्रतिनिधी ) - केहिन फाय व्यवस्थापनाने करारासंदर्भात घेतलेल्या आडमुठे धोरणाच्या निषेधार्थ केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय संभाजी गायकवाड यांनी आज पासुन चाकण औद्यगिक वसाहती मध्ये आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. 
   केहिन फाय प्रा.लि. हि जपान सारख्या पुढारलेल्या देशातील कंपनीची स्थापना चाकण मध्ये  २००० साली  झाली. व्यक्तीचा सन्मान असे उद्योगाचे तत्व असलेल्या याकंपनी मधील कामगारांची पगारवाढ गेल्या १९ महिणांपासुन रखडलेली आहे. करारा संदर्भात व्यवस्थापनाने उत्पादनाचे अवास्तव     देवून सुरूवाती पासुनच आडमुठेपनाची भूमिका घेतली सदर      कुठलाही शास्त्रीय आधार नाही. यासंदर्भातील कुठल्याही आधारभुत बाबींची पुर्तता न करता  व्यवस्थापन आपल्या अवास्तव अशा उत्पादनाच्या मागण्यांवर ठाम राहिले व हेच सदर करार लांबण्याचे खरे कारण ठरले आहे. उत्पादना विषयी तोडगा काढण्यासाठी युनियनने व्यवस्थापनास कामाचे मोजमाप शास्त्रीय पध्दतीने करण्याविषयी वारंवार सुचविले. त्यासंदर्भात बाहेरील प्रमाणित संस्थेकडून अथवा उभयपक्षी उत्पादनाचे निकष ठरविण्याचे लेखी व तोंडी करण्याचे वारंवार कळविले आहे. परंतु सदर बाबीस व्यवस्थपनाने कुठलाच प्रतिसाद दिला नाही. उत्पादनवाढी विषयक अनेक प्रस्ताव युनियनने व्यवस्थापनास सादर केले. मात्र व्यवस्थापन आपल्या अवास्तव उत्पादन वाढीवरच ठाम आहे. व्यवस्थापनाने  कामगारांच्या पगारवाढीच्या प्रस्तावाचा संबंध अवास्तव अशा उत्पादन वाढीशी जोडून युनियनला वेठीस धरण्याचे धोरण अवलंब केला आहे.
         युनियने व्यवस्थापनास वारंवार सांगितले आहे की गेल्या १९ महिण्यांपासुन करार प्रलंबीत आहे तेंव्हा वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, कामगारांचा जीवनस्तर उंचविण्यासाठी, कामगारांच्या मुलांना चांगल्या प्रतिचे शिक्षण मिळण्यासाठी, वृध्द आई-वडिलांच्या औषधोपचारचा खर्च व इत्यादीसाठी उत्पादनाशी निगडीत नसणारी पगारवाढ द्यावी. त्यानंतर उत्पादनवाढ व पगारवाढ एकत्रीतपणे करता येईल. परंतु वरील कुठल्याही बाबींसाठी १/- रू. ही न देता व्यवस्थापनाने सर्वच्या सर्व पगारवाढीचे प्रस्ताव अवास्तव अशा उत्पादनाशी जोडेले आहे. 
        युनियनने सदर करार अस्तीत्वात यावा याकरीता अनेक मागण्या मागे घेत वाटाघाटी करीत भरपुर प्रयत्न केले परंतु व्यवस्थापनने मात्र आपले आडमुठे धोरण तसेच ठेवले. यापुढे जावून व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी युनियनने सनदशीर मार्गाने चाकण औद्यगिक वसाहती मधुन रॅली काढने, कंपनी गेट ते महाळुंगे  टु व्हिलर रॅली, काळी संक्रात, घंटानाद अशा प्रकारची अनेक आंदोलने केली परंतु व्यवस्थापनाने याला सुध्दा दाद दिली नाही.
    तेव्हा व्यवस्थापनाने घेतलेल्या आडमुठे धोरनाच्या निषेधार्थ केहिन फाय एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष मा. श्री. दत्तात्रय संभाजी गायकवाड यांनी आज दि. ०२ एप्रिल २०१७ पासुन आमरण उपोषणास आरंभ केला. या उपोषणास पाठींबा देण्यासाठी अॅड. मा. श्री. धर्मेंद्रजी खांडरे भारतीय जनता पार्टी संर्कप्रमुख पुणे जिल्हा. सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. मारूती भापकर , पत्रकार नंदकुमार साकुर्डेकर, एम्प्लॉईज युनियन ग्रामपंचायत महाळुंगे उपसरपंच नाना मिंडे , युवा नेते मा.श्री. रोहीदास तुपे, जेष्ठ पत्रकार मा. श्री. मनोहर दाभाडे, हनुमंत लांडगे पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघ लॉरियल एम्प्लॉईज युनियन, कोजेमे एम्प्लॉईज युनियन, बॉश एम्प्लॉईज युनियन,हुन्दाई एम्प्लॉईज युनियन सनसेरा एम्प्लॉईज युनियन सुपरजीत एम्प्लॉईज युनियन यादी युनियन प्रतिनिधींनी येवून कामगारांच्या न्याय हक्कासाठी चालवलेल्या लढ्यास उत्स्फूर्त पाठींबा दिला. ( प्रतिनिधी - शरद भोसले ) 

Post a Comment

 
Top