दौंड ( प्रतिनिधी ) - दौंड तालुक्यात वाळूमाफिया "झिंगाट" असल्याची बातमी आपल्या महाराष्ट्र वार्ता न्यूजवर आल्यावर , बातमी वाचून अनेक वाळूमाफिया , अधिकाऱ्यांचे धाबे दनानले होते , महाराष्ट्र वार्ताची बातमी हजारो लोकांनी वाचून वाळूमाफियांवर कारवाई होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले होते ,1 एप्रिलला महाराष्ट्रवार्ताने वाळूमाफियांचा आणि अधिकार्यांच्या मिलीबगतनेच वाळू उपसा चालत असल्याची बातमी दिल्यानंतरआज दोनच दिवसात वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली आहे ,तहसीलदार विवेक साळुंखे , तसेच मंडलाधिकारी ,तलाठी याच्या पथकाने कानगाव भीमा नदीपात्रात असणार्या चार फायबर बोटी जिलेटीनच्या सह्हायाने उद्वस्त केल्या , तसेच काही वाळूच्या गाड्या सुद्धा पकडण्यात आल्या ,यानंतर वाळू माफियांवर "मोक्का" अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात येईल अशी माहिती सुद्धा यावेळी तहसीलदार विवेक साळुंखे यांनी दिली . ( प्रतिनिधी - निलेश जगताप )
Post a comment