0
दौड ( प्रतिनिधी ) -  दौड तालुक्यातील रोटी,हिगणीगाडा,वासुंदे,जिरेगाव लाळगेवाडी,तसेच संपुर्ण जिरायत पट्टयात यंदा चारा टंचाई व पाणी टंचाई काही प्रमाणात भासत आहे, यामुळे मुक्या जनावरांना ओसाड माळरानावरील सुका चारा खाऊऩ आपल्या पोटाची भुक मारावी लागत आहे,
गत वर्षी वासुंदे येथे जनहित रक्षक सेवा भावी संस्था महाराष्ट्र राज्य व अध्यक्ष विठ्ठल थोरात याच्या सहकार्याने ३ एप्रिल  ते १० जुन या कालावधीत जनावरांसाठी मोफत चारा छावणी उपलब्ध केली होती. यामुळे येथील पशुधारकांना पशुधन जगवण्यासाठी चांगले सहकार्य झाले होते.
गेल्यावर्षी तिव्र भिषण दुष्काळ असताना शासन स्तरावरुन कुठलीही ठोस मदत शेतकय्राना झाली नाही . काही समाजसेवी संस्था, सेवा भावी संस्था यांनी दुष्काळ निवारणासाठी येथील शेतकरी बंधुना फार मोठी मदत करण्यात आली. यंदा  पावसाचे प्रमाण चांगले होते परंतु जिरायत भागाला मोठ्या पावसाने हुलकावणी दिलीच,त्यामुळे येथील शेतकरी पुरता अडचणीत सापडला होता.पंरतु जानाई उपसा सिचंन योजनेतुन शेतीसाठी एक आर्वतन मिळाल्याने येथील शेतकर्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने शेतकरी सुखावला आहे. येणाय्रा काळात पाणी टंचाई भासणार आहे, जिरायत पट्टयात असलेल्या सर्वच जनतेला  दुष्काळाशी संघर्ष करण्यास शासनाने जलसंधारणाची भरीव कामे करुन मदत करण्याची गरज आहे अशी चर्चा शेतकरी व ग्रामस्थामध्ये होताना दिसत आहे.
जानाई शिरसाई उपसा सिचंन योजनेतुन पिण्यास पाणीसाठा उपलब्ध असणाय्रा तलावांना स्वतंत्र चाय्रा झाल्यास  जिरायत भागास कमीत कमी पिण्याचे तरी पाणी मिळेल व जिरायत भागाची ओळख टँकर मुक्त होईल.  जानाई शिरसाई उपसा सिचंन योजनेची राहिलेली अपुर्ण कामे पुर्ण झाल्यास व वर्षातुन किमान दोन वेळा पाणी मिळाल्यास येथील शेतकरी सशक्त होवु शकतो.( प्रतिनिधी - निलेश जांबले )

Post a Comment

 
Top