0
दौड ( प्रतिनिधी ) -    दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील प्रदुषणाने व वारंवार अपघाताने चर्चित असणाय्रा एमआयडीसी मधील जलप्रदुषण व वायुप्रदुषणाने पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात झाली आहे कुरकुभं एम आय डी सी क्षेत्रामध्ये रासायनिक कंपन्याची संख्या जास्त आहे.या रासायनिक कंपऩ्यामधुन मोेठ्या प्रमाणात रसायन मिश्रीत पाणी उघड्यावर सोडले जाते,हे दुषित पाणी पिऊन वन्य प्राणी,पाळीव जनावरे,पशु-पक्षी,भुचर यांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशा घटना वेळोवेळी घडल्यावर स्थानिकांनी तक्रारी देवुन कोणत्या कंपनीवर कडक अशी कारवाई होताना दिसत नाही,कंपनी व्यवस्थापन व अधिकारी याची कायमच आर्थिक हातमिळवणी होत असल्याने अधिकारी वर्ग गेढ्यांची कातडी पाघंरुन सुस्त बसलेला असतो असे  बोलले जात आहे. यामुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढली आहे.बहूचर्चित असणारी कुरकुभं एम आय डी सी मध्ये वारंवार अपघात प्रदूषण याचा त्रास स्थानिकांना सहन करावा लागतो मात्र एम आय डी सी उशाला पण नोकरी करता कशाला असा सल्ला कंपनी व्यवस्थापऩाकडुन स्थानिकांना देण्यात येत आहे. स्थानिंकाना नोकरीमध्ये कायमच दुय्यम वागणुक दिली जाते.नोकर भरती करत असताना स्थानिकांना आतापर्यंत कायमच खालच्या दर्जाची वागणूक दिली गेली आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये प्राधान्य दिले जात नाही. त्यामूळे भुमीपुत्रांच्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे. पात्रता असलेल्या  विद्यार्थ्याने कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला असता त्या अर्जांची कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही,कसलाही प्रतिसाद दिला जात नाही.स्थानिक कामगाराने एच आर डिपार्टमेंन्ट  कडे किंवा मँनेजर कड़े तक्रार केली असता स्थानिक कामगारांना उडवा उडविची उत्तरे एैकावी लागत आहेत. जे गावकरी पुढारी प्रदुषण व अपघात यांस खतपाणी खालुन  प्रश्नांवर पांघरूण घालतात आर्थिक तडजोडी करतात.अशांना कंपनीमधे कंत्राट दिले जातात. काही वेळेस एखादया विद्यार्थ्यांची  पात्रता असेल तर अशावेळी एखादया  गावपुढाय्राची शिफारस घेवुनच त्यांना काम दिले जाते.आणि काहींना पात्रता असूनही नोकरीपासुन वंचित रहावे लगते. व अशा काही अनेक कारणांमुळे सुशिक्षिताना नोकरी मिळणे. कठीण झाले आहे. आणि दिवसेंदिवस गावांमध्ये सुशिक्षित बेकारींचे प्रमाण वाढत चालले आहे.यामुळे येथील स्थानिक तरुणामध्ये असंतोष पसरत आहे. शिक्षण होऊन देखील न मिळणाऱ्या रोजगारामुळे युवक चुकीच्या मार्गाचा अवलंब करीत आहेत यामूळे पुढील काळातील  स्थिति बदलत असल्याचे दिसते. स्थानिकांना त्यांच्या क्षमतेनुसार काम व अन्य व्यवसाय उपलब्ध करून देणे व स्थानिकांना मार्गी लावणे काळाची गरज आहे.लोकप्रतिनिधीनी  (याप्रश्नी लक्ष देवुन भुमिपुत्रांना न्याय मिळवुन द्यावा हि माफक अपेक्षा स्थानिक करित आहेत. ( प्रतिनिधी -निलेश जांबळे )

Post a Comment

 
Top