0
दौड  ( प्रतिनिधी ) - पांढरेवाडी ता दौड, येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेत वार्षिक स्नेहंसमेलन, अर्थात गौरव मराठी कलेचा हा सांस्कृतिक कार्यक्रम १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता  घ्याण्यात आला .या कार्यक्रमात प्रामुख्याने पारंपारिक वेशभुषा, एेतिहासिक देखावे, स्री सन्मान, या सारखे स्तुत्य उपक्रम सादर करित उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांचा पाउसच पाडला.या कार्यक्रमामध्ये शाहिर, लावणी, शेतकरी गिते, मराठी, इग्रजी बातम्या,  नाटक या सह एका पेक्षा एक सरस कार्यक्रम बालचंमुनी सादर करुन उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
सध्या सर्वत्र इग्रजी माध्यम शाळांचे फ्याड गाजत असताना शिक्षणात खाजगीकरणाचा बाजार माडंणाय्रा संस्थांना फाटा देत पांढरेवाड़ी व परिसरातील इग्रजी माध्यम शाळेतील मुलांचा व पालकांचा  मराठी माध्यम शाळेकडे कल वाढतच आहे.
मुलांना शालेय शिक्षणाबरोबर माहिती तंत्रन्यान तसेच पारंपारिक कला,वेशभुषा माहिती असणे आवश्यक आहे ती आम्ही जास्तीत जास्त देवुन गुणवंत विद्यार्थी घडवण्यावर आम्ही भर देत असल्याचे मुख्याध्यापक रामगुडे  यांनी सांगितले.या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष  दौंड एस आर पी गट क्रमांक ५ चे समादेशक संजय शिंत्रे , सरपंच सौ तृप्ती निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारगिल इंडिया कंपनीचे राजाराम शिंदे , दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शांताराम जगताप , व शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत सर्व सदस्य  आदी  मान्यवर, बहुसंख्य विद्यार्थी व  पालक उपस्थित होते. ( प्रतिनिधी -निलेश जांबळे ) 

Post a Comment

 
Top