0
दौंड तालुक्यात वाळूमाफिया झालेत “शिरजोर”
दिवसरात्र वाळू उपसा..कारवाई मात्र शून्य.....

दौंड ( प्रतिनिधी ) - दौंड तालुक्याला काळ्या सोन्याच “नंदनवन” म्हणाल जात...कारण दौंड तालुक्याच  अर्थकारण नेहमीच वाळू” भोवतीच फिरत राहिलंय सध्या भीमा नदीच्या पत्रातून कानगाव , आलेगाव आणि नानविज या परिसारत बोट,पोकलेनजेसीबी च्या सह्हायाने अवैध वाळू उपसा दिवसरात्र जोमात सुरु आहे खुलेआम वाळू उपसा सुरु असताना महसूल विभाग मात्र कोणतीच कारवाई करताना दिसून येत नाहीहे , त्यामुळेच आता  वाळूमाफियानी महसूलच्या काही अधिकार्यांना कर्मचार्याना विकत घेतले कि काय? अशी चर्चाच दौंड तालुक्यात जोर धरू लागलिये.
    वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ अशी आपल्याकडे प्रयत्नवादाची महती सांगणारी म्हण रुढ आहे. परंतू याच वाळूला सोन्याचे महत्त्व आले आणि ती कुठल्याही प्रयत्नाविना कमी श्रमात अधिक पैसा मिळवनारे वाळूमाफिया” तयार झाले, काही निवडक पोलिस आणि निवडक महसूल यंत्रणेतील अधिकार्‍यांशी मिलीभगत असल्याने या वाळू ाङ्गियांचे सारे गैरव्यवहार बिनबोभाट सुरू असतात दौंड तालुक्यातून मुळा- मुठा आणि भिमा अशा दोन नद्या वाहतात. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणवर वाळूचे साठे आहेत येथे वाळू उपसा परवाने मिळवण्यासाठी स्थानिकच नव्हे तर बाहेरचे ठेकेदारही गळ टाकून बसलेले असतात. एकदा का शासनाने निश्‍चित केलेली बोली लावून लिलाव घेतला की हे ठेकेदार वाळूचा बेसुार उपसा करायला मोकळे होतात. शासनाचे आणि पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून यांत्रिक बोटी आणि जेसीबीद्वारे वाळूचा दिवसरात्र बेसुार उपसा केला जातो.  काही निवडक पोलिस  आणि महसूल खात्यातील अधिकारी वाळू उपशाकडे  जाणीवपूर्वक कानाडोळा करतात आणि राजकारणी नेते अभय देऊन मोकळे होतात. असे हे सारे सोयीचे रॅकेट चालू आहे.  कानगाव , आलेगाव नांनविज परिसारत लिलाव सुद्धा नसताना खुलेआम वाळू उपसा सुरु आहे  दौंड तालुक्याच्या अर्थकारणावर वाळू व्यवसायाचा मोठा प्रभाव आहे. वाळू उपशासाठी ग्रामपंचायतीची परवानगी  लागते. ग्रामपंचायतीच्या ठरावाची खोटी कागदपत्रे जिल्हा प्रशासनाला सर्रास सादर केली जातात. वाळू उपसा परवान्याची मुदत संपली तरी न्यायालयाच्या खोट्या आदेशाची कागदपत्रे पुढे करणारे महाभाग या धंद्यात दौंड तालुक्यात आहेत. तहसिलदारजिल्हाधिकारी यांचे बनावट शिक्के वापरले जातात.
 शेकडो पेक्षाही जास्त बोटींद्वारे वाळू उपसा चालू असताना तालुक्याला सगळी माहिती असताना महसूलला याची कबर का लागत नाही? खबर ण  लागण्यामागे अर्थपूर्ण व्यवहार असल्याचीच सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा चालुहे.. कानगाव , आलेगाव ,देऊळगाव राजे , मलठण , नांनविज परिसारत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा चालू असताना प्रशासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रशासन व्यवस्थापोलीस खातेमहसुल खाते,वाळूमाफियांनी पोखरून काढले आहे. त्यामुळे धाड पडणार असेल तर त्यांना अधिच माहिती मिळते. त्यामुळे महसुल खात्याची कारवाई म्हणजे ‘फार्सच ठरतो. कमी श्रमात अमाप फायदा मिळतो. वाळू माफियांवर आतातरी कारवाई होईल हिच अपेश सर्वजन व्यक्त करत आहेत.....( पत्रकार निलेश जगताप ) Post a Comment

 
Top