0
माहूर ( प्रतिनिधी ) - माहूर येथिल बालकृष्ण प्री प्रायमरी स्कुल चे वार्षिक स्नेह सम्मेलन स्थानिक जगदंब धर्म शाळेच्या सभागृहात शेकडो पालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार हाजी कादर दोसाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम गंदेवाड,एमजीबीचे शाखा व्यवस्थापक चव्हाण, नगरसेविका प्रिया गंदेवाड शंकरराव गोडसे,रमेश वांगे,भाग्यवान भवरे,यांची उपस्थिती होती.
स्नेह संमेलन मधील सहभागी नर्सरी, यु.के.जी,एल के जी च्या चिमकल्या विद्यार्थ्यांनी साज चढवून एका पेक्षा एक सरस गीते सादर करून प्रेक्षकांची वाहवा तर मिळवलीच पण ग्रामस्थांनी व उपस्थित मान्यवरांनी बक्षिसांची खैरात करून बालकलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.या माहुर गडाची शान आई तुझ देवुळ,चला जेजुरी ला जाऊ या,उदे ग अंबे उदे,या भक्ती गिता सह प्रेम रतन धन पायो, वाट बघतोय रिक्षावाला या सह झिंग झिंग झिंगाट अशा गिता वर टाळ्यांच्या कडकडाटाने अख्ख्या सभागृहा दनदानवला होता.यावेळी बोलतांना जेष्ठ पत्रकार कादर दोसाणी म्हणाले की,अशा कार्यक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतो.कोणीही अचानकपणे मोठा कलाकार होत नसून लहान लहान कार्यक्रमातील सहभागातूनच कलाकार घडत असतो.पालकांनी आपल्या पाल्यांना आभ्यासा बरोबर विविध कला प्रकारांत सहभाग घेण्यासाठी मनोबल  वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतिल टिचर सोनाली कोंडे,मनिषा कोडगीलवार,प्रियंका पारडकर, रोहिणी चव्हाण,भाग्यश्री पोपुलवार, पुजा तालपल्लेवार यांनी परिश्रम घेतले. ( प्रतिनिधी - सरफराज दोसानी ) 

Post a Comment

 
Top