0
माहुर ( प्रतिनिधी ) - स्वच्छ भारत अभियानांतर्गत माहुर शहर हगनदरी मुक्त झाल्याचा संदेश देण्यासाठी आज मंगळवार दि.11 रोजी नगर पंचायत माहुर च्या वतिने शहरात भव्य मोटार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवुन  आ.प्रदिप नाईक यांच्या हस्ते तर नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,जिप चे उपाध्यक्ष समाधान जाधव  उपनगराध्यक्ष राजकुमार भोपी,माजी उपानगराध्यक्ष शोभा महामुने,मेघराज जाधव,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.यावेळी रॅलीत सुमारे 200 दुचाकींचा समावेश होता.
मागील चार महिन्यांपूर्वी अस्तीत्वात आलेल्या नुतन नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकां सह कर्मचाऱ्यांनी शहरात मोठ्या प्रमाणावर जणजागृती करुन शौचालयाचे महत्व पटवून देत  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.802 शौचालय निर्माण करण्याचे उद्दिष्ट नपच्या टिम ने अल्प काळात   पुर्णतत्वा कडे नेले.
स्वच्छ भारत अभियान या महत्वकांक्षी योजनेची केंद्र सरकार कडुन अंमलबजावणी होत असताना राज्यातील 50 नगरपालिका हगणदरीमुक्त करण्याचा शासनाने गत वर्षी निर्णय घेतला होता.नगरविकास विभागाच्या या उपक्रमात मराठवाडय़ातील दोन शहरात तिर्थक्षेत्र माहुर चा समावेश करण्यात आला.सन 2018 पर्यंत 285 नगरपालिका आणी मोठी गावे हगणदरीमुक्त करण्याचा शासनचा मानस असुन त्यात प्रथम 50 छोटी शहरे 'स्मार्ट'करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.समाजाला कृतीतून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या नावाने महाराष्ट्र शासनाने हगणदरीमुक्त ग्राम स्वच्छता अभियानाची संकल्पना राबवुन छोट्या गावांना राष्ट्रपती च्या हाताने पुरस्कार देण्यात आले होते.
शासनाने संपुर्ण देशात स्वच्छतेचा संदेस पोहचवुन आरोग्यदायी जिवनाचे महत्व पटवुन देतांना श्रमदानाचा मुलमंत्र दिला.त्यासाठी लहान शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन आणी हगणदरीमुक्ती साठी सर्व राज्यांना भरपुर निधी हि दिला.त्यात राज्य सरकारने आपला वाटा देत अभियानाला गती दिली.ज्या शहरामध्ये एक हजार पेक्षा कमी कुटुंब उघड्यावर शौचास जातात अशी 60 शहरे निवडल्या गेली.माहुर शहराचा त्यात समावेश होउन 802 शौचालय निर्मीतीचे टारगेट देण्यात आले होते.ते आता पुर्ण झाले असुन उघड्यावर शौचास जात असलेल्या पाच ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधण्यात येउन उघड्यावर जाणाऱ्या लोटे बहाद्दरांनावर आंकुश लावण्यात आले आहे.याचे फलीत म्हणजे शहर हगणदरीमुक्त झाले असुन गुरवार दि.13 रोजी शहरात स्वच्छतेचा आढवा घेण्यासाठी राज्यस्तरीय पथक दाखल होणार असल्याचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी सांगितले.स्वच्छता रॅली मध्ये नगरसेवक इलीयास बावानी,रहमत अली,शितल जाधव,रफिक सौदागर,शकिला बि, दिपक कांबळे, सागर(गोपु) महामुने, प्रा.भगववान राव जोंगदंड,आनंद तुपदाळे पाटील,विनोद कदम,नाना लाड,निरधारी जाधव,अजिज भाई,विजय शिंदे,शेख मोसीन,वशीम कुरेशी,निलेश तायडे,कार्यालयीन अधिक्षक वैजनाथ स्वामी,अभियंता प्रतिक नाईक,मजहर शेख,देविदास सिडाम, केसाळीकर, पांडे, थोरात,यांच्यासह पत्रकार व स्वच्छता प्रेमी नागरीक उपस्थित होते. ( प्रतिनिधी - सर्फराज दोसानी )

Post a Comment

 
Top