0
( मोरगाव येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त शिवराय,फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांचे झाले कायया विषयावर व्याख्यानाचे आयोजन )
मोरगाव ( प्रतिनिधी ) -छत्रपती शिवराय, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुलेराजर्षी शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरया महामानवांचे विचारच देशाला महासत्ता बनवतील आणि सोबतच देशात समता निर्माण करतील  असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांनी केले. मोरगाव येथे फुले शाहू आंबेडकर विचारमंच यांच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्तशिवराय,फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांचे झाले कायया विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच पोपटराव तावरे ग्रामपंचायत सदस्य छगन नेवसेआरती नेवसेनयना नेवसे विश्वसेवा संस्थेचे हभप पिराजीमहाराज नेवसे सुरेश साबळे ,शुभम साबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे मयुरेश्वर मंगल कार्यालय येथे  उद्घाटन झाले .
यावेळी बोलताना जगताप यांनी सर्वच महामानवांच्या जीवनावर प्रकाश टाकला ,महात्मा जोतिबा फुले यांचे कार्य अलौकिक असून, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास सामान्य माणसाच्या उद्धाराचा मार्ग मोकळा होऊ शकतो. महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेणे आजची गरज आहेथोरांचे विचार अंगीकारल्यास आदर्श समाज निर्मितीस वेळ लागणार नाही. सर्वच महामानवांनी केलेले कार्य विशिष्ट जाती, समाजासाठी नव्हते, तर ते सर्व मानवजातीच्या उद्धारासाठी होते, म्हणूनच सर्वांनी जातिभेद विसरून, एकत्र आले पाहिजे,, भारताच्या इतिहासात अनेकांनी क्रांती घडविली आहे. स्वराज्याकरिता माँ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजसंभाजी महाराज यांनी क्रांती केली. सामाजिक परिवर्तनासाठी महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रयत्न केले. त्यांनी दाखविलेला मार्ग आजही अंगिकारता येण्यासारखा आहे, रंतु आज  समाज सर्वच महामानवांच्या विचारांचा मार्ग  विसरत चालला असल्याची  खंत त्यांनी व्यक्त केली.
महात्मा फुले जयंतीदिवशीच शिवरायांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी रायगडावर ढोल वाजवून साजरी करणार्यांचा सुद्धा त्यांनी व्याख्यानात समाचार घेतला जयंती हि आनंदाने साजरी करायची असते तर पुण्यतिथी हि पाळायची असते एवडी साधी अक्कल ढोल वाजवणाऱ्या  महाभागांना नाही एकवेळ तुमच्या डिग्रीतील भेसळ सहन करू पण तुमच्या रक्तातली भेसळ  बहुजन समाज सहन करणार नसल्याचे म्हणत त्यांनी एका जबाबदार मंत्र्यांना सुद्धा टोला हाणलाबापाच्या मृत्यूचा दिवस आनंदाने साजरा करणाऱ्या औलादीचाच ढोल वाजवणे गरेजेचे असल्याचे मत सुद्धा जगताप यांनी व्यक्त केले.
बळीराजाचा अंश असणार्या या देशातला आजचा बळीराजा रोजच मरतोय , आत्महत्या करतोय ,देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून जेवढ्या जवानांनी बलिदान दिले नाही त्या पेक्षा जास्त शेतकर्यांनी स्वातंत्र्यानंतर या देशात आत्महत्या केलेल्या आहेत , मुळात या आत्महत्या नाहीत तर इथल्या व्यवस्थेने केलेल्या त्या हत्या आहेत, शेतकर्यांनी आता रडयेला नाही तर लढायला शिकल पाहिजे अस आवाहन सुद्धा त्यांनी शेतकर्यांना केल.कार्यक्रमाचे आयोजन हनुमंत शिंदे अजित गुंड ,दादा नेवसे ,विनायक नेवसे , युवराज नेवसे यांनी केले ,प्रास्ताविक नाना नेवसे यांनी तर सूत्रसंचालण आणि आभार मंगेश तावरे यांनी व्यक्त केले


Post a Comment

 
Top