0
( नायगाव येथे शिवजयंती निमित्तानेढाल तलवारीच्या पलीकडचे शिवरायया विषयावर  व्याख्यानाचे आयोजन  )

वाठार स्टे. ( प्रतिनिधी ) -
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून त्यांचे सर्वोत्तम पुत्र व्हाल ,तेव्हा तुम्ही 21व्या शतकातील शिवाजी महाराज झाल्याशिवाय राहणार नाही , जगाच्या पाठीवर करोडो रुपये खर्चले तरी संस्कार विकत मिळणार नाहीत तर जगाच्या पाठीवर संस्कार करणारे स्वतच्या पायावर पोरांना उभ करणार एकमेव चरित्र छत्रपती शिवाजीमहाराजांचं आहे म्हणून तुमच्या मुलांना शिवचरित्र वाचायेला द्या कारण शिवचरित्र वाचणारी पोर आई बापाला कधीच वृद्धाश्रमात पाठवणार नाहीत अस मत प्रसिध्द शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी नायगाव येथील व्याख्यानात व्यक्त केले.

सुळशी नायगाव येथे आयोजित शिवजयंतीनिमित्त आयोजित  व्याख्यानमालेत ढाल तलवारीच्या पलीकडचे शिवरायया विषयावर जगताप बोलत होते , यावेळी आकाश शिळमकर ,सुरेश साबळे ,संदीप जगताप आधी विविध मान्यवर उपस्थित होते , श्री. जगताप म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्माचे मावळे होते , त्यांचा संघर्ष धार्मिक नव्हे तर राजकीय होता ,मात्र इतिहासकारांनी त्यांचे चित्रण धार्मिक केल्याने विषमतेची दरी काही काळ निर्माण झाली होती मात्र , वाचनामुळे खरा इतिहास लोकांना समजू लागला आणि शिवाजीमहाराज हे धर्माला तोडणारे नाहीत तर धर्माला जोडणारे आहेत हे समजले ,एकीकडे अमेरिका तीनशे वर्षापूर्वीची दगड गोळा करून देशाची स्मारक म्हणून जगाला दाखवते मात्र आमच्या देशातील गड कोट ही आमची खरी-खुरी स्मारके असताना आम्ही मात्र त्याकडे दुर्लक्ष्य करतोय त्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे , गडांच्या संवर्धनासाठी शासनाने लक्ष्य देण्याची गरज असल्याचे सुद्धा ते म्हणाले . लोक म्हणतात शिवाजीराजे तुम्ही पुन्हा जन्माला या, पण शिवाजीराजांना जन्म देणाऱ्या जिजाउचीच जेथे उदरात हत्या होते , तेथे शिवाजीराजे जन्माला येणारच कसे? असा प्रश्न उपस्थित करीत शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी समाजविघातक प्रवृत्तीवर सुद्धा  घणाघाती हल्ला चढवला . प्रारंभी स्वागत विशाल धुमाळ , आशिष निगडे यांनी पाहुण्यांचा प्रास्ताविकात परिचय करून दिला. शिवप्रतिमेचे पूजन निलेश जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आकाश शिळमकर ,सुरेश साबळे ,संदीप जगताप उपस्थित होते , कार्यक्रमाचे नियोजन सुहास धुमाळ ,चेतन पवार, राजूत धुमाळ , विलास धुमाळ ,निलेश धुमाळ , नितीन धुमाळ ,कुणाल धुमाळ ,अमित जाधव , वैभव धुमाळ यांनी केले ,यावेळी  सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, नागरीक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

 
Top