0
पालम ( प्रतिनिधी ) -पालम तालुक्यातील पेठशिवणी येथील मुलाचे नांदेड सिडको येथील मुलीसोबत रितरिवाजा प्रमाणे लग्न झाले होते. मात्र काही वर्षा नतंर नवरा, सासु, भाया, जाऊ, यांच्या कडून मुलीस त्रास होत होता. त्यामुळे मुलीने पालम पोलीस स्टेशन येथे आर्ज दिला. या वरून मुलगा शेख चॉद फते आहेमद रा.पेठशीवणी व नांदेड सिडको येथील मुलगी याना पोलीस स्टेशन पालम येथे बोलाऊन त्याची दोन वेळा बैठक घेण्यात आली. व नंतर या बैठकीत नवरा बायकोचे भांडन का होत आहेत याचे कारण समजल्या वरून या दोघाना समजुन सागुन त्याचा पुन्हा संसार जोडण्यात पालम पोलीस स्टेशन व महिला सुरक्षा समितीला यश आले. व दिनांक 1 एप्रिल 2017 रोजी नवरा बायकोना नांदण्यास पेठशिवणी येथे पाठविण्यात आले. यावेळी स.पो. निरक्षक रविंद्र बोरसे, महिला सुरक्षा समितीच्या अरुणा शर्मा, महिला पोलीस पाटवदे, पेठशिवणी बिट जमादार P.u.राठोड, A.s.i.चौरे आदि यावेळी उपस्थित होते. या पुर्वी पोलीस स्टेशन पालम येथील महिला सुरक्षा समितीच्या माध्यमातुन अनेका चे संसार जुळविण्यात
यश आले आहे. ( प्रतिनिधी - शांतीलाल शर्मा ) 

Post a Comment

 
Top