0
मुंबई  (प्रतिनिधी)  -    पत्रकारांवर होणाऱ्या वाढत्या हल्लयांंची दखल घेत  पत्रकार हल्ला विरोधी कायदा करण्याच्या दृष्टीने राज्यातल्या युती सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिला होता. मात्र, अधिवेशन संपत असण्याच्या पाश्र्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या कायद्याच्या मसुद्यास मंजुरी देण्यात आली. पत्रकारांना संरक्षण देण्याच्या कायदा बनवण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या मसुदा समितीकडून हा मसुदा तयार करण्यात आला होता. या मसुद्यास मंजुरी देऊन युती सरकारने कायदा करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
    राज्यात पत्रकारिता करताना पत्रकारांवर होणाèया हल्ल्यांची गंभीर दखल घेत राज्यभरातल्या विविध १६ पत्रकार संघटनांनी हल्लाविरोधी कृती समितीची स्थापना केली होती. कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेल्या १२ वर्षांपासून आंदोलने छेडण्यात आली होती. सुरू अधिवेशनात डीएनएचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामुळे संतप्त पत्रकार संघटनांनी सरकारवर दबाव आणला होता. आघाडी सरकारने कायदा करण्यात चालढकल केली. त्याचप्रमाणे भाजप सरकारकडूनही वेळ मारून नेली जात असल्याची चर्चा सुरू होती. याप्रकरणी विरोधकांनी विधानपरिषदेत सरकारला जाब विचारला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी याच अधिवेशनात विधेयक आणण्याची तयारी दर्शCवली होती. हे अधिवेशन उद्या संपत असले तरी विधेयक अडू नये, म्हणून मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हल्लाविरोधी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला.मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर आता हे विधेयक सभागृहात मांडले जाऊन त्याला अंतिम मंजुरी दिली जाईल. पत्रकारांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी त्यांना संरक्षण देणारा कायदा व्हावा याकरिता २००५ साली मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात माजी गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांनी आश्वासन दिले होते. पत्रकारांना संरक्षण नसल्यामुळे हल्ल्याचे प्रमाण वाढले होते. त्यानंतर २०१० मध्ये राज्यातील १६ पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन केली होती. या समितीने कायद्याच्या पाठपुराव्यासाठी राज्यभर पत्रकारांची आंदोलने छेडली. मोर्चे, निदर्शनं, मोटाररॅली, मुकमोर्चे, जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे आयोजण्यात आले होते. या आंदोलनाला आता यश आल्याने राज्यातल्या पत्रकारांमध्ये आनंद साजरा होतो आहे. राज्यातल्या पत्रकारांच्या लढ्याचे हे यश असल्याची प्रतिक्रिया हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांनी दिली.

Post a Comment

 
Top