0
पुणे मनपा अंतर्गत शिक्षण मंडळात लाखोंचा महाघोटाळा?

पुणे ( प्रतिनिधी ) -पुणे महानगरपालिकेत  शिक्षण मंडळ अंतर्गत पुणे शहरात सुमारे ३२०शाळा  येतात. मंडळा तर्फे या मनपा शाळेतील इ. १ ली ते इ. ७ वी च्या सर्व  विद्यार्थ्यांना MS-CIT चे शिक्षण देण्यासाठी आर्थिक तरतुद करून खर्च करण्यात येतो ,  या प्रशिक्षणापोटी महानगरपालिकेने Mkcl ला २५ लाखाच्यावर बिल देण्यात आले. मात्र कोणत्याही मनपा शाळेत MS-CIT प्रशिक्षण दिलेले नाही. सर्व मुख्याध्यापकांना तर हा कोर्स सुरू केला हे माहिती सुद्धा नसून  MS-CIT न शिकवता हे पैसे उचलले गेले आहेत. ,एकाही विद्यार्थ्याची MS-CIT ची परीक्षा झालेली नाही. तसेच मंडळाने प्रशिक्षण देण्याच्या नावावर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज शिक्षण मंडळ कार्यालय  पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात आले .
   मनपा शाळेत गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्याची मुले शिक्षण घेतात त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालच पाहिजे. हा त्यांचा हक्क आहे. *शिक्षण मंडळाला* MKCL मार्फत #MS-CIT चे प्रशिक्षण कोठे झाले, कधी झाले याबाबत काही माहिती मागितल्यास शिक्षण विभागाकडून कोणतेही उत्तर मिळत नाही. उलट टोलवाटोलवी केली जाते, हा संपुर्ण प्रकार शाळेला तर माहितीच नाही. म्हणजे यात निव्वळ सर्व पक्षिय व अधिकाऱ्यांच्या संगनमताने लाखो रूपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी या वेळी सांगतिले , यावेळी संभाजी ब्रिगेडचे  शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सुभाष जाधव, जोतिबा नरवडे, सिध्दार्थ कोंढाळकर, सुरेखा जुजगर, विवेक तुपे, जयकर कदम. आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

 
Top