0
पुणे ( प्रतिनिधी ) - पुणे येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानातील गडकरी यांच्या शिल्पाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार आहे , संभाजी ब्रिगेडच्या वतीने महापौर मुक्ता टिळक यांना निवेदन देऊन 'छत्रपती संभाजी महाराज" उद्यानात लवकरात लवकर संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी केली आहे , यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी वेळ आलीच तर अस्तित्वाच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी असल्याचे सांगितले , येणाऱ्या काळात "गडकरी" मुद्य्यावरून नेमके काय होतंय त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

 
Top