0
कोल्हापूर ( प्रतिनिधी ) - छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला तसेच स्वराज्याची राजधानी असणर्या रायगडावर महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाची बैठक घेण्याची मागणी छत्रपती शिवराय आणि राजर्षी शाहू महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन पुढे जात असतांना शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे सुराज्य व्हावे यासाठी घेतलेली शपथ काय होती आणि कशासाठी होती हे समजण्यासाठी हि बैठक महत्वाची असेल असंही ते म्हणाले. महाराष्ट्रातील सर्व किल्य्यांचे संवर्धन आणि संरक्षण करणे हेच ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले ,मंत्र्यांना रोपवे ने घेऊन या मात्र मंत्री मंडळाची बैठक ही रायगडावरच घ्या अशी मागणी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आश्वासन दिल्याचीही आठवण संभाजीराजे यांनी करून दिली.

Post a Comment

 
Top