0
कोल्हापूर मध्ये नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याचा प्राधान्याने विचार करु
 केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री
मा.प्रकाश जावडेकर यांचे खा.संभाजीराजे छत्रपती यांना आश्वासन.

 कोल्हापुर ( प्रतिनिधी ) - कोल्हापूर ही कलानगरी राजर्षी शाहू महाराजांनी उभी केली,  राजर्षी शाहू महाराजांनी प्रत्येक क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे, तसेच शिक्षणासाठी हि दिले आहे.महाराष्ट्रातील जनतेला मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याची सुरुवात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी १०० वर्षापूर्वी केली होती. त्याच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कोल्हापूर नगरीत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आजपर्यंत केंद्रीय विद्यालयाची स्थापना होवू शकली नाही, म्हणून आज गुरुवार सकाळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेमध्ये मागणी केली कि, देशामध्ये प्राथमिक व माध्यमिक स्तरावर सर्व सामान्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी केंद्रीय व नवोदय विद्यालयाव्यतिरिक्त काय प्रयत्न केले आहेत असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच गुणवत्तापुर्ण संस्था स्थापन करण्यासंदर्भात सरकारने आतापर्यत काय पावले उचलले आहेत व कोण कोणत्या पर्यायांचा विचार केला आहे असा प्रश्न ही उपस्थित केला. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मा. प्रकाश जावडेकर यांनी सांगितले कि, आतापर्यत देशात नविन ४८ केंद्रीय विद्यालये व नवोदय विद्यालये स्थापन केली असून दि.१५ मार्च २०१७ रोजी नविन ५० केंद्रीय विद्यालयांना मान्यता दिली आहे.
 कोल्हापूरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मातील मुलांना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून मोफत शिक्षण व वसतीगृहाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळेच आज कोल्हापूर जिल्ह्यातील मुले व मुली सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, पण आज काल शिक्षणाचा खर्च सामान्यांना परवडणारा नसून हुशार व होतकरु विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षणापासुन वंचित रहात आहेत म्हणून कोल्हापूर येथे केंद्रीय विद्यालय सुरु झाल्यामुळे सर्व सामान्य विद्यार्थ्याना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार आहे.महाराष्ट्र सरकारकडून कोल्हापूरमध्ये नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा त्यास मंजूरी देवून लवकरच कोल्हापूर मध्ये केंद्रीय विद्यालय सुरु करण्याची ग्वाही मनुष्यबळ विकासमंत्री मा.प्रकाश जावडेकर यांनी दिली.

Post a Comment

 
Top