0
भोर ( प्रतिनिधी ) - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी सगळ्यात जास्त काळ ज्या गडावर व्यथित केला तो म्हणजे राजगड , राजगड  स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने  सुद्धा उत्कृष्ट नमुना आहे.त्यावरील चिलखती बांधणी,बाल्लेकील्ला ,आता दोनच दिवसापुर्वी राजगडावर नविन तटबंदी सापडली .याचीच शहानिशा करण्यासाठी,तसेच सुरु असलेले काम योग्य पध्दतीने सुरु आहे की नाही हे पाहण्यासाठी  आणि पुढील कामाचे नियोजन जाणुन घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज  आणि राजर्षी शाहू महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे यांनी आज राजगडाला भेट दिली ,राजे सकाळी ७ वा गडावर दाखल झाले.पुरातत्व खात्याच्या आधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेवुन राजगडावर सुरु असणाऱ्या कामांची पाहणी केली., या अगोदर ११ वर्षापूर्वी राजांनी  राजगडावर चार,पाच दिवस मुक्कामाला राहून त्यांनी .संपुर्ण गड पाहीला होता , तसेच ते दरवर्षी राजगडला भेट देत असतात , राजगडवर जाणे म्हणजेच एक दिव्य म्हणावे लागेल, इतका  हा उंच किल्ला आहे. रायगडासारख्या सोई सुविधा नाहीत.त्यामुळे शिवप्रेमी सोडले तर पर्यटक किंवा विदेशी अभ्यासक आभावानेच  या गडावर येतात.आता पुरातत्व खात्याने काही विकासकामे सुरु केली आहेत. ती योग्य पद्धतीने व्हावी तसेच किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व जपून त्याचा विकास व्हावा यासाठी राजेंचे प्रयत्न सुरु आहेत.
किल्ल्यावरील उत्खन करत असताना त्याची कागदोपत्री पूर्तता करून त्याचा विकास आराखडा तयार करून मगच किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घ्यावे,गड किल्ल्यांसाठी शासनाने वर्ग केलेला निधी हा आर्थिक वर्ष संपायच्या आत खर्च करावा लागतो, तसे न झाल्यास तो निधी रद्द होऊन परत जाण्याची शक्यता असते त्यामुळे घाईगडबडीत विकासकामे उरकून घेण्यात येतात,हे असे न होता तो परत वर्ग करण्यात यावा,यासाठी PLA (पर्सनल लेजर अकाउंट) ची तरतूद करण्यात यावी, विश्रामगृहाची त्वरित दुरुस्ती करून किल्ल्यावर येणाऱ्या महिला दुर्गप्रेमींच्यासाठी स्वच्छता गृहाची सोय करावी,कित्येक दिवसापासून रखडलेले राजसदरेचे काम तातडीने पूर्ण करावे,गडावर नियमित स्वच्छता राखली जावी तसेच पर्यटकांना स्वच्छतेबाबत सूचना द्याव्यात,महाराष्ट्रातील किल्ल्यांचे दुरुस्ती आराखडे लवकरात लवकर तयार करून घ्यावे त्यासाठी लागणारा वाढीव निधी शासनाकडून मिळवून देऊ अशी ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. तसेच महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींच्या कडून संभाजीराजे यांच्या कडे राजगड संदर्भात काही सुचना आल्या होत्या त्या हि आधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अशा प्रकारची पहिलीच बैठक प्रत्यक्ष काम सुरु असलेल्या किल्ल्यावर झाली आहे. गडकील्ल्यांच्या विषयी राजेंचे असलेले प्रेम,व तळमळ यातुनच स्पष्ट दिसते. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या कामासाठी संभाजीराजे यांचे सुरु असलेले प्रयत्न व पाठपुराव्यामुळे  निश्चितच गडकिल्ल्यांना पुर्ववैभव प्राप्त होईल .Post a Comment

 
Top