0
सातवीच्या विध्यार्थ्याने वाचविले नववीच्या मुलाला 
दोन सख्या भावांना वाचविणारा सातवीचा विध्यार्थी 

  शहापुर ( प्रतिनिधी ) -.शहापूर तालुक्यातील चोंढे तेथील प्रकल्प विद्यालयात सातवी च्या वर्गात  शिकणारा मधुकर व नववीत शिकणारा तुकाराम या  दोन मुलांनी तब्बल चार मुलांना पाण्यात बुडतांना  वाचविण्यात यश आले आहे.या धैर्यामुळे शाळेतील शिक्षकांनी कुणाच्या आदेशाची वाट न पहाता त्यांचे कौतुक केले आहे
     आज  प्रत्येक स्वार्थी वृत्तीचा  बनलेले असतांना मात्र तालुक्यातील सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावरील  चोंढे येथील शेकट वाडी येथील दोन विध्यार्थ्यानी सा-यांच्याच . डोळ्यात माणुसकीचे अंजन घातले आहे.ते आपल्या जीवाची पर्वा न करता एक नाही तर तब्बल चार मुलांचा जीव वाचवून!
      वार शनिवार शाळा सुटल्यानंतर गौरव नितीन खैरनार,कल्पेश नितीन खैरनार,हे दोघे .सख्ये भाऊ व त्यांच्या बरोबर त्यांचे मित्र  असलेली  दोघे  भूषण डोहळे,व प्रकाश डोहळे हे न्यू इंग्लिश स्कूल डोळखांब असे  चौघे चोंढे येथील दरीत असलेल्या के.टी बांधा-यात पोहायला  गेले असता गप्पागोष्टी मारता मारता कल्पेश पाण्यात पडला हे पाहून त्याचा भाऊ गौरव  ने पाण्यात उडी मारली त्याच वेळी भूषण,व प्रकाश हे हि पाण्यात उतरले मात्र चौघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहताही येत नसल्याने ते गटांगळ्या खावू लागताच तेथे कपडे धूत असलेल्या महिलांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली असता तो आरडाओरडा ऐकून  मधुकर पांडू पोकळा  व त्याचा  मित्र तुकाराम हे  घटना स्थळी आले त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करताच पाण्यात उड्या घेतल्या व एक एक करून चोघांना पाण्याचा बाहेत काढले त्यांच्या पोटात पाणी गेले असल्याने त्यांना पालथे करून त्यांच्या पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केल्याने ते चौघे ही शुद्धीवर आले.घडला प्रकार मुलांनी आपल्या घरी सांगितल्यावर त्यांच्या पालकांनी त्या विध्यार्थ्याच्या कार्याचा गौरव केला .हि वार्ता कळताच प्रकल्प विद्यालयातील शिक्षक कुमार उबाळे,विजय पिलकर,नारायण दरोडा,गणेश पवार ज्ञानेश्वर सातपुते,तसेच शाळेचे शिपाई अनंता भेरे ,यांनी या आपल्या लाडक्या मुलाचा गौरव केला . म्हणतात ना  देव तारी त्याला कोण मारी  .आज या चारही जणांना वाचविणारे हे दोघे देवदूत ठरले एव्हढे मात्र नक्की.यातील तुकाराम नामदेव धुपारी याची आई वडील दोन महिन्या पूर्वीच वारल्याने तो दुखीः असतांनाही दुस -यांचे आश्रू पुसणारा असा त्यांच्यासाठी तो देवदूतच ठरला आहे.  या दोन्ही मुलांचे अभिनदन कोकण मराठी साहित्य परिषदेचे  सभासद व पत्रकार बी . डी. गायकवाड यांनी केले आहे . ( प्रतिनिधी - बी.डी.गायकवाड ) 

Post a Comment

 
Top