0
शहापूर (  प्रतिनिधी ) -- शहापुर तालुक्यातील आदिवासी बहुल वस्ती असणाऱ्या पठार भागावर  सलग चौथ्या वर्षी बॉटूलिझम विषबाधेने थैमान घातले आहे,या विषबाधेत ,हिंगलुद,मेट येथील जनावरे मृत झाल्याबाबतचा अर्ज ग्रामस्थानी पंचायत समितीचे तालुका    पशुधन विकास अधिकारी डॉ ए पी पाटील यांच्याकडे केला आहे . यात मृत जनावरांचे पंचनामे करुण भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
    तालुक्यातील टाकीपठार ,साकडबाव,तलवाड़ा पठारावर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे.रोजगाराचि गंभीर समस्या असल्याने शेती व्यवसायवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात,मात्र शेती उपयोगी जनावरे बॉटूलिझम विषबाधेने मृत पावत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. सन् 2013-14 रोजी चिलारवाडीतील 88,सन् 2014-15 रोजी चिंधिचिवाडीतील 40,सन् 2015-16 रोजी लाख्याचिवाडी,मधलीवाडी,राणविहीर येथील 30 जनावरे सदर विषबाधेत मृत झाली असून यावर्षी फेब्रुवारी मार्च या अवघ्या दोन महिन्यात हिंगलुद व् मेट येथील शेतकऱ्यांची बैल 49, गाय 67 व् वासरु 9 अशी एकूण 125  जनावरे मृत झाली असून मृत जनावरांची संख्या वाढण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करतात. विषबाधेचि लागण झालेले जनावर 5 ते 6 तासतच् उपचार अभावि मृत होतात,जनावरांमधे क्षरांची कमतरता,पुरेसा खुराक नसने,मृत जनावरे उघड्यावर टाकने,कुजलेल्या हाडातील व् पालापाचोल्यातील विष मोकाट जनावरानी खाने,कुजलेले आंबे खाने,पुरेसा पोटभर पाणी न मिळणे,ही या विषबाधेचि मूळ कारणे असून गुरांचे पायबळ जाणे,ताकद कमी होणे,शेपटि लुळी पडणे,चालता न येणे,जणावराला उठता न येणे,भूक मंदवणे,लाळ सांडने,अंग गार पड़ने,पाय व् शेपटीला सुई टोचल्यास वेदना न होणे ही विषबाधेचि लक्षणे आहेत.
   घटनास्थळी तालुका पशुधन अधिकारी डॉ ए पी पाटील,पशुधन पर्यवेक्षक एस एन ठाकरे, आर पडवळ, एस डी शिर्के, डी जी देशमुख यांनी भेट देऊन उर्वरित विषबाधित जणांवराणा लसिकरण करुण विषबाधेबाबतचि सविस्तर माहिती देऊन सदर विषबाधा रोखण्यासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात याबाबत शेतकरयाना माहिती दिली. ( प्रतिनिधी -बी.डी.गायकवाड )

Post a Comment

 
Top