0
सिंदखेडराजा ( प्रतिनिधी ) - बुलडाणा जिल्हातील सिंदखेड राजा तालुक्यातील सोयंदेव येथील अपंग शेतकरी देवानंद नागरे यांनी तहसीलदार सिंदखेडराजा यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन विविध कर्ज फेडु शकत नसल्यामुळे ईच्छामरणाची परवानगी मागीतल्याने तालूक्यात खळबळ ऊडाली आहे.
याबाबत सवीस्तर असे की तालूक्यातील सोयंदेव येथील देवानंद नागरे हे अपंग दाम्पत्य वृद्ध आई सह राहत आहे.सदर दाम्पत्य हे अपंग असून त्यांच्या कडे ०.७२आर कोरडवाहू जमीन आहे.सतत ची नापीकी व मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्यां कडुन जमीन पेरणी करूण घेणे व बिबीयान्या चा खर्च वसुल नहोणे .व त्यातच  विदर्भ क्षेत्रीय कोकण बँकेचे ७० हजार कर्ज ,तुकाराम कायंदे अर्बन बँकेचे १लाख,तर गावठी १लाख १० हजार रू असे एकुण २ लाख ८० हजाराचे डोक्यावर कर्ज त्यातच वृद्ध आई व आईला रक्तदाब ,दमा व शुगरची बिमारी या साठी महिन्याकाठी होणारा ३६०० रु खर्च असा हा  अपंग  कौटुंबिक गाडा त्याचबरोबर पत्नीला दोनदा बाळंतपणात शस्ञक्रीया करावी लागली अशा मुळे देवानंद नागरे आर्थिक दृष्टीने हदबल झाले आहे.अशातच महसुल विभागाने तणावग्रस्त शेतकरी म्हणून प्रमाणपत्र दिले त्यामुळे असे वाटले काहीतरी लाभ मिळेल परंतु हे प्रमाणपत्र नुसते कागद झाले आहे.दोघेही पती पत्नी अपंग असल्यामुळे काम धंदा करू शकत नसल्यामुळे कुटुंबाच्या ऊदरनीर्वाहा चा प्रश्न निर्माण होवुन हदबल झाल्या चे देवानंद नागरे यांनी निवेदना त व्यक्त करीत मुख्यमंत्री  यांना नम्रपणे ईच्छामरणाची परवानगी मागीतली असल्यामुळे तालुक्यात खळबळ ऊडाली आहे.अपंग शेतकरी यांनी शेवटी कंटाळून ईच्छामरणाची परवानगी मागीतली आहे. ( प्रतिनिधी - गजानन काळूसे )

Post a Comment

 
Top