0
सासवड ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुक्याचे आमदार तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना  कॅबिनेटमंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे,  भाजपा , सेना एकत्र सत्तेत असले तरी त्यांच्यातील वाद मात्र सातत्याने जनतेसमोर येत आहे , मात्र तरीही खिशातले राजीनामे गुंडाळून सत्तेतच राहायचं असाच शिवसेनेचा मनसुबा दिसतोय शिवसेनेनं आपल्या मंत्र्यांच्या खांदेपालट करण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे  . यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची तातडीने बैठक बोलावली आहे. गुरुवारी 6 एप्रिलला 'मातोश्री'वर ही बैठक संध्याकाळी होणार आहे.
कॅबिनेटमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि डाॅ.दीपक सावंत यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात आमदारांची नाराजी आहे. आतापर्यंत तीनवेळा शिवसेनेच्या आमदारांच्या बैठका झाल्या असून या बैठकीत आमचीच कामं होत नाही. आपण सरकारमध्ये आहोत का ?, असा सवाल बैठकीत केल्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळण्याची शक्यता आहे. तसंच हे चारही मंत्री विधानपरिषदेवर निवडून आले असून थेट जनतेतून निवडून येणाऱ्या आमदारांना डावललं जातंय अशी भावना आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही व्यक्त केल्याचंही समजतंय. ज्या कॅबिनेट मंत्र्यांना डच्चू दिला जाईल त्यांचा पक्षकार्यासाठी वापर केला जाईल.
त्यामुळे राज्यमंत्री असलेल्या विजय शिवतारे  यांना प्बडती मिळण्याची चर्चा आहे. राज्यमंत्री शिवतारे यांनी मोठ्याप्रमाणावर आपल्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणला आहे ,तसेच पुरंदर पंचयात समितीवर सुद्धा आताच भगवा फडकवला , त्याचप्रमाणे राज्यभर शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून सुद्धा त्यांची ओळख झालीये , कॅबिनेटमंत्रीपदाच्या चर्चेने पुरंदर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालाय , त्यामुळे नेमक काय होतंय ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Post a Comment

 
Top