0
वाशिम ( प्रतिनिधी ) - नेहरू युवा केंद्र वाशिम च्या जिल्हा युवा समन्वयक डॉ दत्ता देशमुख यांच्यावर भ्रष्ट व मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात   दी. 30 मार्च पासून आमरण उपोषण सुरु असून आज या उपोषणाचा ५ वा दिवस असून पूर्ण झालेला आहे  , आजरोजी दोन उपोषकर्त्यांची ताबियात अत्यंत खालावली आहे तरी सुद्धा अध्याप प्रयन्त या उपोषणाची कोणतीच दखल घेतली नाही,त्या करीत विविध संघटनेने या उपोषणाला पाठिंबा दरशुवून वाशिम जिल्हा प्रशाषणाचा जाहीर निषेध करत आहेत,उपोषण करते युवा कौर पंकज गाडेकर, सौरभ गंगावने, पवन राऊत यांना विविध सामाजीक संघटन व राजकीय क्षेत्रातून पाठिम्बा मिळत असल्याने प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
उपोषण कर्त्यांच्या मागण्या रास्त असल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य अनिल काम्बळे ,नगर परिषद सभापति राहुल तुपसांडे ,विनोदभाऊ पट्टेबाहदूर जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग रा.कॉ. पार्टी वाशिम जिल्हा , पंचायत समिती सभापती व उपसभापती ,हरिदास बनसोड कृषी मित्र वाशिम जिल्हा, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष गजानन भोयर, बबन आरु , भाजप बेटी बचाव बेटी पढाओ चे जिल्हा संयोजक  डॉ दीपक ढोके , निलेश सोमानी भाजयूमो चे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील, माजी आम. विजय जाधव, दिलीप जोशी ,भा ज यू मो , ने यू केंद्र चे माजी सल्लागार समिती सदस्य गजानन धामणे, अमोल देशपांडे , जिल्हा सरचिटनिस सूरज चौधरी , उपाध्यक्ष आनंद गडेकर , विनोद जवलकर,  मुख्यमंत्री मित्र कपिल सारडा , गणेश खंडाळकर , कैलाश मुंगनवार, गिरिश शर्मा, सचिन शर्मा अन्यायग्रस्त युवा कौर तस्लिम पठान , आकाश सोलंके, आदिंनी उपोषण कर्त्यांना पाठिम्बा देऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तर जिल्हा परिषद सदस्य गजानन अहमदाबादकर, शेतकरी संघटनेचे नारायण वीभुते सम्भाजी ब्रिगेड चे जिल्हा सचिव बबन आरू तालुकाध्यक्ष राजू कोंगे यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष व समाजातील ख्यातनाम लोकांनी उपोषणाला पाठिम्बा दिला.

Post a Comment

 
Top