0


     पुणे ( प्रतिनिधी ) -- पुरंदर तालुक्यातील बेलसर गावाचे सुपुत्र निखिल जगताप यांना पुणे येथील शब्दविद्या कला,साहित्य, सांस्कृतिक युवा मंचतर्फे देण्यात येणारा युवा साहित्यिक प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
     निखिल जगताप हे नवोदित युवा कवी साहित्यिक असून त्यांनी विविध विषयावर कविता व साहित्य लेखन केले आहे. अल्पवयात साहित्य निर्मिती केल्याची दखल घेऊन पुणे येथील शब्दविद्या कला साहित्य सांस्कृतिक युवा मंचने युवा साहित्यिकांना प्रेरणा मिळावी म्हणून "युवा साहित्यिक प्रेरणा पुरस्कार२०१७" देवून गौरव केला.
           कार्यक्रम प्रसंगी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा मेघराज राजे भोसले, कवी संमेलन अध्यक्ष हनुमंत चांदगुडे युवा मंच चे अध्यक्ष ऋषिकेश अ.सूर्यवंशी संस्थापक हृदयमानव अशोक यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.तसेच प्रसिध्द व्याख्याते निलेश जगताप ,विक्रमराजे शिंदे , राहुल थोपटे यांनी सुद्धा भेटून शुभेच्छा दिल्या , निखिल जगताप यांचे विविध स्थरातुन अभिनंदन होत आहे.

Post a Comment

 
Top