0

( यवत येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ढाल तलवारीच्या पलीकडचे शंभूराजे” या विषयवार व्याख्यानाचे आयोजन )

यवत  ( प्रतिनिधी ) – एकीकडे आज आमच्या देशातील मुले जगातील विविध देशांमध्ये जाऊन सुद्धा फारफार तर तीन ते चार  भाषा बोलू शकतात मात्र साडेतीनशे वर्षापूर्वी याच देशात राहून फ्रेंच ,इंग्रजी उर्दू अशा तब्बल सोळा भाषा छत्रपती संभाजी महाराजांना येत होत्या म्हणूनच जगाच्या बाजारपेठेत टिकायच असेल तर बहुभाषिक व्हा असे मत प्रसिद्ध व्याख्याते निलेश जगताप यांनी व्यक्त केले .
दौंड तालुक्यातील यवत  येथे छावा शंभूराजे प्रतिष्ठानतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित ढाल तलवारीच्या पलिकडचे शंभूराजे” या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते .यावेळी बोलताना जगताप यांनी बोलताना लढाईचा काळ आता गेलाय, आता पढाईचा काळ आलाय ,छत्रपती संभाजी महाराज आज पुन्हा जन्माला येणार नाहीत, मात्र चुकून आलेच जन्माला तर  ऑडी कार घेऊन जन्माला येऊन लेखणीच्या तलवारीच्या जोरावर शिक्षणगड जिंकतील, माध्यमगड जिंकून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा पाया मजबूत करतील, प्रशासन गड जिंकून कार्यक्षम अधिकारी होतील , न्यायगड जिंकून कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावतील , फेसबुक , , ट्वीटर सुद्धा वापरातील , व्हाँटसअपवर  आजच्या मावळ्यांशी चँटिंग सुद्धा करतील , परदेशात शिकण्यासाठी गेलेल्या एखाद्या मावळ्याला व्हीडीओ कॉल सुद्धा करतील, राजे काळासोबतच चालतील वाघाचा जबडा फाडण्याएवडी टाकत त्यांच्या बाहुंमध्ये होती, मृत्यूलाही झुकवेल एवडी उच्च कोटीची दुर्दम्य इच्छाशक्ती ,आत्मविश्वास ,स्वाभिमान , राष्ट्रप्रेम संभाजी महाराजांमध्ये ठासून भरले होते म्हणूनच  इतिहासाच्या पटलावर बदनामीचे सर्वाधिक वार  झेलूनही ज्याचा इतिहास मिटवणे इतिहासकारांना  कधीच शक्य झाले नाही त्या संभाजी महाराजांचा इतिहास केवळ ढालतलवारीचा नाहीहे ,संभाजी महाराजांची प्रेरणा घेऊन डोकी भडकवन्यापेक्षा त्यांचा प्रेरानात्म्क इतिहास समजून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले .

आजवर इतिहासात संगमेश्वर येथे मूकर्बखानाच्या ताब्यात संभाजीराजांना त्यांचे सख्खे मेहुणे गणोजी शिर्के यांनी पकडून दिले असे ठासून सांगितलं, मात्र आता केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा २००५ अन्वये संचालक, पुराभिलेख संचालनालय महाराष्ट्र शासन यांना गणोजी शिर्के यांच्याविषयी माहिती मागिवली असता तपासाअंती पुराभिलेख संचालयाने गणोजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिले असल्याचा कोणताही ऐतिहासिक संदर्भ अथवा कोणताही पुरावा आमच्याकडे उपलब्द नसल्याचे नमूद केले , त्यामुळे आजवर इतिहासात गणोजी शिर्केंवर लावला गेलेला बदनामीचा खोटा कलंक आताकुठ  पुसण्यात आला आहे.  औरंगजेबाने संभाजी राजांना शेवट काय विचारले? यावर वाद घालण्यापेक्षा संभाजी महाराजांनी ४० दिवस हालअपेस्ता कशाच्या जीवावर सोसल्या याचा विचार आम्ही कधी केलाय का? संभाजी राजे व्यसनी असते तर ४० दिवस हालअपेस्था त्यांनी सहण केल्याच नसत्या, याचाच अर्थ संभाजी महाराज निर्व्यसनी होते, मात्र त्यांचा इतिहास रंगवताना त्यांना काही व्यसनी इतिहासकारांनी व्यसनी ठरवून टाकल, मोघलांनी महराष्ट्राचा कारभार करावा अशी मानसिकता असणाऱ्या मुठभर वतनदारांनी संभाजीराजा बदनाम जरी केला असला तरी, संभाजी महाराजांचा पराक्रम हा अद्वितीय होता यात शंकाच नाही ,मात्र त्याच वेळी त्यांच्या चारित्र्यात  कुठेच खोट नाही हे सुद्धा तेवढेच सत्य आहे, तसेही जो राजा एकाच वेळी पाच पाच शत्रूशी अहोरात्र झुंजतो त्याला छाबुगिरी करायेला वेळच कुठून मिळणार? असा प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित केला .यावेळी कोल्हापूर येथील शिवमर्दानी खेळाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते .
महेश टिळे  यांनी पाहुण्यांचा प्रास्ताविकात परिचय करून दिला. कार्यक्रमाचे नियोजन दीपक तांबे ,सुशांत दिवेकर ,रोहन दोरगे ,मंगेश दोरगे, नितीन हेंद्रे ,बबन शिवणकर , सुरज चोरगे, मंगेश माभोरे यांनी केले .,यावेळी  शंभूराजे प्रतिष्ठानचे  सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ  मोठय़ा संख्येने उपस्थित होते..

Post a Comment

 
Top