0
जेजुरी ( प्रतिनिधी ) –“वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे,पक्षीही सुस्वरे आळविती या उक्ती प्रमाणे
वृक्षलागवड या विधायक कार्यक्रमाच्या निमित्ताने तसेच जिल्हा परिषद शाळेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत जगताप वस्ती ( कोथळे)  येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या परिसरात वड,पिंपळ,पिंपरण,नांधरूक ,जांभुळचिंच,सिताफळ अशा विविध प्रकारच्या 51 झाडांचे वृक्षारोपण  करण्यात आले तसेच झाडांचे संवर्धन करण्याची शपथ सुद्धा घेण्यात आली.तसेच यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यास दोन झाडे दत्तक देण्यात आली .यावेळी वृक्षलागवडी बाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली, गेल्याच महिन्यात श्री.मार्तंड देव संस्थानच्या माध्यमातून ई-लर्निंगचा सेट शाळेला उपलब्ध करून देण्यात आला असल्याने शाळेची वाटचाल डीजीटल होण्याच्या दृष्टीने सुद्धा चालली आहे, या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे माणिकआबा जगताप, वाल्मीक जगताप, दिलीप जगताप ,प्रकाश जगताप , शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पवार , सहशिक्षक सुधीर जगताप आणि विविध ग्रामस्थविद्यार्थी उपस्थित होते.


Post a Comment

 
Top