0
नीरा ( प्रतिनिधी )- नीरा खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने वीर, नीरा देवघर आणि भाटघर धरणाच्या पाणी साठ्यात वेगाने वाढ होत आहे. शनिवारी रात्री नऊ वाजता वीर धरणाने 82 टक्केची पातळी ओलांडली असून धरणात 28 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी येत आहे. त्यामुळे वीर धरण नव्वदीच्या उंबरठ्यावर असून धरणातून नीरा नदीत कोणत्याही क्षणी 5 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात आणि नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात दुष्काळी परिस्थिती असून यंदाही जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त असतानाच मागील दोन दिवसांपासून निरेच्या खोऱ्यातील पावसाने जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर तालुक्यातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
      वीर धरण उपविभाग सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी 'वीर धरण आज दि २७ रोजी ९.०० वजता ८२.५३ % भरले आहे. धरणामधे २८००० क्यूसेक्स पाण्याची आवक होत आहे. आज रात्री निरा नदीमध्ये कोणत्याही क्षणी ५००० क्युसेक्स पाणी सोडण्यात येईल. आवशकतेनुसार त्यामध्ये वाढ करण्यात येईल.' असे सांगितले.

Post a Comment

 
Top