0
सेउल : उत्‍तर कोरियाने पुन्हा एकदा जगाला आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्‍न केला आहे. जगाची पर्वा न करणार्‍या उत्‍तर कोरियाने परत एकदा दोन क्षेपणास्‍त्र चाचण्या घेतल्‍याने खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या अधिकार्‍यांनी केला आहे.एका वृतानुसार, उत्‍तर कोरियाकडून पूर्वेकडील समुद्रात म्‍हणजेच जपानच्या समुद्रात दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेण्यात आल्या. उत्‍तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची या वर्षीच जून महिन्यात एकत्र बैठक झाली होती. त्‍याआधी उत्‍तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये अशा चाचण्यावरून वातावरण तणावपूर्ण बनले होते. या आधी ९ मे रोजीही उत्‍तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या होत्या. त्‍यामध्ये दोन क्षेपणास्त्र सोडले होते. यावेळी दोन रॉकेटही सोडले गेले होते.
ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रथमच या चाचण्या घेतल्याने उत्‍तर कोरियाची मनिषा पुन्हा एकदा उघड झाली आहे. दरम्‍यान, उत्‍तर कोरियाने कोणतीही चाचणी घेतली आहे ही माहिती मिळवण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेकडून तपास सुरू आहे. अमेरिकेचे राष्‍ट्रपती डोनाल्‍ड ट्रम्‍प यांची जून महिन्यात उत्‍तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांच्यात भेट झाली होती. त्‍यावेळी झालेल्‍या चर्चेत किम जोंग यांनी ट्रम्‍प यांना उत्‍तर कोरिया आपले अण्वस्त्र कार्यक्रम बंद करणार असल्‍याचे सांगितले होते. या भेटीआधी सिंगापूरमध्येही ट्रम्‍प यांनी किम जोंग यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. मात्र या भेटीनंतर उत्‍तर कोरियाला फारसा फरक पडल्‍याचे दिसत नाही.
जपानने यावर बोलताना उत्‍तर कोरियाच्या या चाचण्यांचा आमच्या सागरी क्षेत्रावर कोणताही परिणाम झाला नसल्‍याचे म्‍हटले आहे. केसीएनए या वृत्‍तसंस्‍थेने दिलेल्‍या वृत्‍तात किम जोंग उन यांनी क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या अधिकार्‍यांसमवेत नवनिर्मित पानबुडीचे निरीक्षण केल्‍याचे म्‍हटले आहे. ऑगस्‍टमध्ये दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये सयुंक्‍त युध्द सराव होणार आहे. त्‍या आधीच उत्‍तर कोरियाने क्षेपणास्‍त्र चाचण्या घेतल्‍याने कोरियाच्या जमिनीवर पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊ शकतो. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेदरम्यान होणार्‍या युध्दाभ्‍यासाच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय चर्चेवर परिणाम होण्याची होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

 
Top