0
सासवड ( प्रतिनिधी ) - सासवड  येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यामंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष  मा.अजितदादा पवार यांच्या  वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या  उपक्रमामध्ये  नक्षत्र उद्यानाची निर्मिती करणे तसेच या उद्यानामध्ये २७ नक्षत्राप्रमाणे त्यांच्या विविध प्रकारच्या झाडाची लागवड करण्याचा मानस आहे. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या प्रागंणामध्ये  ऑक्सिजन झोन निर्माण करण्यात आलेली आहे. या झोन मध्ये  १०० ते १५० तुळशीची रोपे लावण्यात आलेली आहेत. यामुळे या परिसरातील ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. सदर  नक्षत्र उद्यानाचे उदघाटन मा.दिगंबर दुर्गाडे -  माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे  यांच्या हस्ते करण्यात आले. मा.दुर्गाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये नक्षत्र उद्यानाचे महत्व समजावून सांगून वृक्ष लागवडीचे फायदे सांगितले. तसेच या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या व या नवीन उपक्रमाबद्दल महाविद्यलयाचे अभिनंदन केले. सदर नक्षत्र उद्यानाच्या उभारणीकरिता डॉ.घनश्याम खांडेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांनी नक्षत्र व नक्षत्राचे वृक्ष व या वृक्षाचे औषधी गुण व त्यांचे उपयोग कशा पद्धतीने कार्यान्वित होतात आणि मनुष्याच्या दैनंदिन आजारामध्ये शास्त्रीय उपयोग सांगितले.
  वाढदिवसाचे औचित्य साधून  या उपक्रमाबरोबर विद्याथ्यांचे पत्र लिखाणाकडे आकर्षण व्हावे व  लुप्त होत चाललेल्या पत्र लिखाणाची संकल्पना  पुनर्जीवित करून आजच्या तरुण पिढीला पत्रलेखनाची ओळख व्हावी म्हणून पत्रास कारण कि या उपक्रमाचे  आयोजन करण्यात आले. त्यामध्ये विद्याथ्यांनी आई - बाबाना पत्र लिहून आई - बाबाच्या बदल असणारे प्रेम या पत्राद्वारे प्रखर केले. या पत्र लेखनाचे उदघाटन मा.संतोष जगताप, मा.महेश जगताप, मा.बंडूकाका जगताप व  महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांच्या हस्ते झाले. मा.संतोष जगताप यांनी आपल्या मनोगतामद्ये पत्रातून व्यक्त  होणाऱ्या भावना या प्रामाणिक असतात असे मत व्यक्त केले. तसेच  महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांनी  आपल्या मनोगतात पूर्वीच्या काळी पत्रातून व्यक्त होणाऱ्या भावना मोबाईल, ई-मेलच्या दुनियेत मनापर्यंत न पोहचता  फक्त डोळ्यापुरत्या मर्यादित राहतात असे सांगितले.
याचबरोबर महाराष्ट्रीयन पारंपरिक खेळाला प्रोसाहन देण्यासाठी महाविद्यलयात जिबली पाणी, सागरगोटे, लगोरी, व विटी दांडू या पारंपरिक खेळाचे आयोजन करण्यात आले. या खेळामद्ये विद्याथ्यांनी उस्फुर्तपणे या खेळाचा आनंद लुटला. या स्पर्धेचे  कार्यक्रमाचे उदघाटन सासवड शहराच्या माजी नगराध्यक्षा मा.कलाताई फडतरे  यांच्या हस्ते झाले. मा.फडतरे यांनी आपल्या मनोगतामद्ये महाविद्यालयाने राबविलेल्या उपक्रमाबद्दल महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांचे कौतुक व अभिनंदन केले. व महाविद्यालयाने राबविलेले खेळाचे व तरुण पिढीला तंदुरुस्थ राहण्याकरिता किती महत्वाचे आहेत हे समजावून सांगितले. सादर कार्यक्रमाचे आयोजन प्रा.वैभव शिळीमकर व प्रा.अमोल काळे यांनी केले.


Post a Comment

 
Top