0
इंदापूर (  प्रतिनिधी ) - लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे इमाने इतबारे काम करणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्या वाट्याला पुन्हा विश्वासघात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे इंदापूरची जागा पुन्हा जिंकतील त्यामुळे राष्ट्रवादी हि जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडणार नाही असा पवित्रा राष्ट्रवादीने जागा वाटपाच्या बैठकीत घेतला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत असा कयास राजकीय जाणकारांनी लावला आहे.
        हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या विधानगाथा पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण दिले. मात्र या भेटीत त्यांनी राजकीय मुद्द्यांना देखील हाताळले आहे असे बोलले जाते आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीला ज्या प्रमाणे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हक्क सोड करण्यावरून गाजला होता. त्याच प्रमाणे इंदापूर देखील गाजणार आहे असे चित्र सध्या दिसते आहे.
                   लोकसभा निवडणुकीच्यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या सोबत जुळवून घेत असल्याचे चित्र येथील राष्ट्रवादीने दाखवले. तसेच सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना पुढे करण्यात आले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या बाबत कामा पुरता मामा असा पवित्रा राष्ट्रवादी अवलंबते आहे का असा सवाल देखील आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे हि जागा काँग्रेसला सुटणार का? राष्ट्रवादी लढवणार? हर्षवर्धन अपक्ष कि भाजपच्या चिन्हावर ? या प्रश्नाची उत्तरे तूर्तास देता येणार नाहीत.

Post a Comment

 
Top