जेजुरी ( प्रतिनिधी ) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिर मधील सामान्य कुटुंबातील होतकरू विद्यार्थ्यांना राजे शिवराय प्रतिष्ठान आणि विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अजमुद्दिन इनामदार, नगरसेवक सचिन सोनवणे, शिवसेना शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा.पोपटराव ताकवले, रामशेठ दोशी, शिवव्याख्याते निलेश जगताप, माजी नगरसेवक अशपाक पानसरे,पर्यवेक्षक दिलीप जगताप, सामाजिक कार्यकर्ते कुमार गावडे, श्रेयश दरेकर, माजी सैनिक भाग्यवान मस्के उपस्थित होते. समाजातील बहुसंख्य होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होऊन शिक्षणाची ओढ लागावी जेणेकरून हे विद्यार्थी भविष्यतील चांगले नागरिक बनू शकतील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच राजे शिवराय प्रतिष्ठान आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्यामंदिरच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला . कार्यक्रमाचे नियोजन राजे शिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पठाण यांनी केले . कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.पोपटराव ताकवले यांनी केले. सूत्रसंचलन सतीश निगडे , सुबोध गुरव यांनी केले तर पर्यवेक्षक दिलीप जगताप यांनी आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a comment