0
जेजुरी ( प्रतिनिधी  - पुणे जिल्हाचे तत्कालीन पालकमंत्री खासदार गिरिष बापट साहेब यांच्या  सहकार्याने  व गिरिष जगताप , सचिन  पेशवे यांच्या पाठपुराव्यामुळे  जेजुरीतील उमापती लॉज  ते विजाळा विहिर कडेपठार पायथा या रस्त्याचे काम पुर्ण होवून पाच ते सहा महिने झालेले  परंतु लोकसभेच्या निवडणुका काळात  आचारसंहिता  असल्यामुळे सदर कामाचे औपचारिक  उदघाटन होवू शकले नव्हते त्यामुळे  राज्यमंत्री  बाळा भेगडे यांच्या  हस्ते आज  या रस्त्याचे उदघाटन करण्यात  आले,  यावेळी सरचिटणीस बाळासाहेब  गरुड, तालुकाध्यक्ष  सचिन  लंबाते, जिल्हा उपाध्यक्ष  गिरिष  जगताप , संगितादेवी निंबाळक,  किसान मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष  सचिन पेशवे , जिल्हा चिटणीस आर एन  जगताप ,हवेलीचे अध्यक्ष  पंडित मोडक, हवेलीचे सरचिटणीस धनंजय कामठे ,राहुल शेवाळे, शहराध्यक्ष  अशोक खोमणे,  पुणे जिल्हा युवामोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी, राहुल यादव, सागर भुमकर, सासवड शहराध्यक्ष  साकेत जगताप,मा चिटणीस प्रसाद अत्रे ,महीला तालूका अध्यक्ष अलका शिंदे , ॲड दशरथ  घोरपडे, भटके विमुक्तचे अध्यक्ष गणेश भोसले  विजय पवार ,श्रीकांत ताम्हाणे  प्रतिक झगडे,  चंद्रकांत  झगडे, नंदकुमार झगडे,आमोल जगताप  आदी मान्यवर उपस्थित  होते.Post a Comment

 
Top