0
जेजुरी ( प्रतिनिधी ) - पुरंदर तालुक्यात मागील आठवड्यात बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस झाला नसल्याने  अनेक भागात जनावरांना अजून नवीन चारा उपलब्ध झालेला नाही, त्यामुळे शासनाने चारा छावण्या १ ऑगस्टनंतरही एक महिनाभर सुरू ठेवाव्यात अशा प्रकारची मागणी नाझरे काँलनीतील चारा छावणीतील  शेतकर्यांकडुन होऊ लागली आहे.
         नाझरे काँलणीतील छावणीत ९०० हुन अधिक जनावरे असुन श्रीनाथ पतसंस्थेकडुन ही छावणी चालवली आज आहे...  शासनाने शेतकर्यांच्या  या छावणी मुदतवाढीच्या मागणीचा विचार करून एक महिनाभर मुदत वाढ करावी अशा प्रकारची मागणी शेतकर्यांकडुन होऊ लागले आहे. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी ३१ जुलै पर्यंतच्या परिस्थितीचा आढावा शासनाला कळविण्यात येईल व राज्य सरकारकडून जो काही निर्णय होईल तो कळविला जाईल असे सांगितले.
     पुरंदर तालुक्यात काही ठिकाणी थोड्या फार प्रमाणात पाऊस झाला असला तरी जनावरांना खायला घालायला चारा अजून उपलब्ध झाला नाही, नवीन चारा पिकांसाठी किमान एक महिना कालावधी लागणार आहे. त्यामुळे शासनाने किमान अजून एक महिना तरी छावण्या सुरू ठेवाव्यात अशी मागणी सर्वत्र पशुपालक शेतकरी करीत आहेत.

Post a Comment

 
Top