0
सासवड ( प्रतिनिधी ) -  पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ.)च्या नूतन कार्यकारिणी निवड कन्या शाळा सासवड येथे पुणे आज जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मा श्री जी.के. थोरात सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर नूतन कार्यकारिणी मध्ये पुरंदर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी केदारेश्वर विद्यालय काळदरी येथील  संजय भिंताडेसर , कार्याध्यक्षपदी न्यू इंग्लिश स्कुल जवळार्जुन  विद्यालयाचे बाबुराव गायकवाडसर, तर सचिवपदी शिक्षणमहर्षी  पतंगराव कदम विद्यालयाचे जालिंदर घाटेसर,उपाध्यक्षपदी माध्यमिक विद्यालय यादववाडीचे मंगेश बोरकरसर , न्यू इंग्लिश स्कुल गुरोळीचे प्रदीप दुर्गाडेसर व सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांची बिनविरोध निवड झाली. सदर निवडप्रक्रियेमध्ये निरीक्षक म्हणून पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडेसर व पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वसंतराव ताकवलेसर यांनी काम पाहिले . या निवडीबद्दल सर्व कार्यकारिणीचे पुणे जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष नंदकुमार सागरसर व पुरंदर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष सुधाकर जगदाळेसर यांनी अभिनंदन केले. यावेळी पुरंदर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष रामप्रभु पेटकरसर,बारामती तालुका टी.डी.एफ.चे नेते किशोर दरेकरसर,महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष निलेश जगतापसर ,सुरेश संकपाळ सर व तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळातील शिक्षक  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तानाजी झेंडे यांनी तर सूत्रसंचालन पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे सचिव श्री इस्माईल सय्यदसर यांनी केले.

Post a Comment

 
Top