पुणे ( प्रतिनिधी ) - सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराची दिवसेंदिवस झपाट्याने कायापालट होत असल्याने जमिनीचे भाव गगनला भिडले आहेत. त्यामुळेच अनधिकृतपणे मोकळ्या जमिनीवर, जुन्या वाड्यावर बळजबरीपणे ताबा टाकणे. मसल पावर दाखवून नागरिकांना त्रास देणे असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत व आले आहेत. असाच एक प्रकार नुकताच उघडीस आला आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते , श्री मार्तंड देव संस्थान जेजुरीचे विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा यांच्या जमिनीवर भू माफिया यांच्याकडून पुणे महानगर पालिका व भूमाफिया यांच्याकडून ताबा टाकण्याचा प्रयत्न उघडीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बिबवेवाडी येथील त्याच्या खाजगी जागेवर भू माफियांनी ताबा टाकण्याचा प्रयत्न केला असून त्या संदर्भात पोलीस व प्रशासन यांच्याकडे तक्रार करून देखील त्यांची कोणीही दखल घेतली नसून उलटा जबाब पोलीस व प्रशासन लोढा यांनाच विचारत आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याची आणि एका देवसंस्थानच्या विश्वस्ताची भू माफियाकडून होत असलेली पिळवणूक, न्यायासाठी ठोठावले दरवाजे मात्र पोलिस व प्रशासनाच याची दखल का घेत नाहीत, यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. एका निर्मात्यावर अश्या प्रकारे दबाव टाकणार असतील तर सामान्य नागरिकांना या भू माफियांचा किती त्रास सहन करावा लागत असेल असा प्रश्न राजकुमार लोढा यांनी उपस्थित केला आहे.

Post a comment