पुणे - शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर आजही कायम राहिल्याने जिल्ह्यातील पूरपरिस्थिती कायम आहे. संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठ्याने गतवर्षीची पाणी पातळी ओलांडली आहे. त्यामुळे धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत आहे.
त्यामुळे पुणे जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून उद्या देखील (6 आॅगस्ट, मंगळवारी ) जिल्हाधिकारी यांनी सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

Post a comment