0
भुलेश्वर : वार्ताहर महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील श्री क्षेत्र भुलेश्वरी आज  श्रावण महिन्यातील पहील्याच दिवशी व पहिल्या सोमवारी हजारो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले.
   यावर्षी श्रावण महिन्यातील  पहिल्या सोमवार दिवशी नागपंचमी आल्याने रात्री १२ वाजल्यापासूनच पंचक्रोशीतील भुलेश्वर भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे पाच वाजता शिवलिंगास दही,दुध,पंचामृतने आंघोळ घालण्यात आली.महाआरती करुन मंदीर भाविकांसाठी खुले ठेवण्यात आले .सहा वाजता जेजुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या हस्ते ग्रामस्थांच्यावतीने महापूजा करण्यात आली यावेळी व इतर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अरुण यादव, सरपंच महादेव बोरावके ,  उपसरपंच मोहन यादव, माजी उपसरपंच माऊली यादव, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र गद्रे ह.भ.प.लक्ष्मण महाराज यादव , उपस्थित होते .दिवसभरात पुरंदर पंचायत समिती सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रेय काळे, व विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांनी दर्शन घेतले .

     सकाळी दहा वाजता माळशिरस येथील काळेवाड्यात श्री क्षेत्र भुलेश्वराची पालखी सजवण्यात आली.माळशिरस गावात ग्रामस्थांच्या समवेत मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर पालखीचे श्री क्षेत्र भुलेश्वरी प्रस्थांन करण्यात आले.दुपारी बारा पाण्याच्या कुंदामध्ये श्री भूलेश्वरांच्या मूर्तीस आंघोळ घालण्यात आली.महाआरती होऊन ढोल ताश्यांच्या गजरात कावड मिरवणुक व बाप्पा मोरया रे च्या गजरात पावसाच्या रिमझिम सरी झेलत  पालखी मिरवणुक काढण्यात आली. दुपारी दोन वाजता श्री क्षेत्र भुलेश्वर मंदीराच्या प्रवेश द्वाराजवळ कावडींची धार घालण्यात आली. यंदा पुरातत्व विभाग , ग्रामस्थ  व पुजारी यांनी योग्य नियोजन केल्याने भाविकांना व्यवस्थीत दर्शन घेता आले.जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने पुरेसा बंदोबस्त देण्यात आला. उत्तरादेवी ट्रस्टच्या वतीने सुरक्षा रक्षक नेमण्यात आले होते .  माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉ.विवेक आबनावे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सहायक तुकाराम आखाडे , सुरेखा जाधव , राजू कांबळे , आरोग्य सेवक कवितके व राउत यांनी दिवसभर आरोग्य सेवा दिली .महावितरण कंपनीच्या वतीने राजू बनकर व घुमरे वायरमन यांनी सेवा दिली .दिवसभरात किरण येपरे मित्र परिवार, कालेकर , ग्रामसेवक संतोष गावडे, अनिल दोरगे,  राहुल गायकवाड , रोहित तुपे या शिवभक्तांकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते .

Post a Comment

 
Top