0
उस्मानाबाद : माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील (Padmasinh Patil) आणि राष्ट्रवादीचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं. राष्ट्रवादी सोडण्यापूर्वी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत पाटील पितापुत्रांनी ही घोषणा केली, मात्र या मेळाव्यात मनसेचं गाणं ऐकू आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
‘दादा… नवी दिशा, नवी आशा… मला तुमच्याशी काही बोलायचंय!! परिवार संवाद, आवर्जून उपस्थित राहा’ अशी भावनिक साद घालत राणा जगजीतसिंह यांनी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. या मेळाव्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, तर दोन-अडीच हजार कार्यकर्ते उपस्थित राहिल्याचं बोललं जातं. मात्र यापेक्षा चर्चा होती मेळाव्यात वाजणाऱ्या गाण्याची.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्यात वाजणारं ‘तुमच्या राजाला साथ द्या’ हे गाणं यावेळी लावण्यात आलं होतं. त्यामुळे राणा जगजीतसिंह नेमके भाजपच्या वाटेवर आहेत, की मनसेमध्ये, याची गमतीदार चर्चा रंगली होती. मात्र अखेर पाटील यांनी भाजपप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला.

Post a Comment

 
Top