0
सातारा ( प्रतिनिधी ) -  राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो.सूत्रांच्या माहितीनुसार उदयनराजेंना भाजप प्रवेश करायचा असेल तर त्यांना आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांनतर ते पक्षांतर करू शकतात. परंतु पक्षांतर केल्यानंतर विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी उदयनराजेंची मागणी आहे. परंतु ही मागणी पूर्ण होणं तांत्रिकदृष्ट्या कठीण असल्याने उदयनराजे त्यांचा भाजप प्रवेश स्थगित करण्याची शक्यता आहे.दरम्यान, उदयनराजेंच्या भाजपप्रवेशावरून भाजपकडून सूचक वक्तव्य केली जात आहेत. त्यात चंद्रकांत पाटील यांनी त्यांनी ‘पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रवेश व्हावा अशी उदयनराजेंची इच्छा असेल ती देखील पूर्ण होईल शेवटी ते राजे आहेत असं विधान केले आहे. त्यामुळे उदयनराजेंना भाजपात घेण्यास त्यांचे नेते इच्छुक आहेत हे स्पष्ट आहे.पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतून वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Post a Comment

 
Top