0
मुंबई ( प्रतिनिधी ) -  आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे तर अनेक नेते भाजप आणि शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. परंतु आता छगन भुजबळ छगन भुजबळ हे उद्या म्हणजे १ सप्टेंबर ला दुपारी १२ वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. .
भुजबळ यांनी शिवसेना प्रवेश करणार असल्याने नाशिक मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. दरम्यान यापूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली होती त्यावेळी पवारांना भुजबळ यांचे मन वळवण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे. तसेच भुजबळ यांनी वारंवार शिवसेना प्रवेशाच्या चर्चांचे खंडन केले होते. परंतु आता सूत्रांच्या माहितीनुसार ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतरामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीतून वैभव पिचड, चित्रा वाघ, गणेश नाईक, दिलीप सोपल यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडले आहेत. तसेच कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Post a Comment

 
Top