0
पुरंदर ( प्रतिनिधी ) - भारतीय कृषीसंस्कृती मध्ये बैलपोळा, नागपंचमी, दहीहंडी, गणेशोत्सव,गौरीपूजन व पितृ पंधरवडा  श्रावण व भाद्रपद महिन्यामध्ये सण, उत्सव व परंपरा यांची रेलचेल असते,
या सर्वांमध्ये विविध फराळ, फळे या बरोबरच विविध भाज्यांचे महत्व आहे, आपल्या परिसरात शेतातील लावलेल्या भाज्यांबरोबरच नैसर्गिकरित्या येणाऱ्या रान भाज्यांचे अतिशय महत्वाचे स्थान आहे, त्यातील आरोग्यासाठी असणारे गुणधर्म ओळखूनच कदाचित पूर्वजांनी आपल्या आहारामध्ये या विविध रानभाज्या यांचा समावेश केला असावा, आपण सर्वजण या रानभाज्यांचे महत्व पूर्वीपासूनच ओळखून आजही आपण आपल्या आहारात घेत आहोत, नवीन पिढीलाही या सर्व रानभाज्या ओळखणे व त्यांचे आहारातील महत्व समजून घेणे या साठी इला फाउंडेशन संस्था रानभाज्या महोत्सव याचे आयोजन करीत आहे,  बुधवार  28 ऑगस्ट 2019 ला  पुरंदर तालुक्यातील पिंगोरीतील इला हॅबिटाट येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी  इला हॅबिटाट या परिसरात लावलेल्या विविध दुर्मिळ वनस्पती, नैसर्गिकरित्या आलेली विविध फुले, औषधी वनस्पती, जलसंधारण, कचऱ्यापासून खत निर्मिती, ग्रामीण संस्कृती संग्रहालय, संशोधन प्रकल्प, पर्यावरण शैक्षणिक प्रकल्प व 'प्रकृती' ग्रामीण आरोग्य केंद्र हे प्रकल्प पाहता येणार आहेत. अधिक माहितीसाठी राजकुमार पवार यांच्याशी ९९२२४९२२२९ या क्रमांकावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता

Post a Comment

 
Top