0
सासवड ( प्रतिनिधी ) -  कॉलेज  लाइफमध्ये प्रवेश करताना विद्यार्थी काहीसे बावरलेले असतात, या मुलांना कॉलेजची तसेच सिनिअर्सची ओळख व्हावी यासाठी साबळे फार्मसी कॉलेज सासवड येथे फ्रेशर्स पार्टीचं आयोजन केले. या कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त माननीय माजी प्राचार्य अरुण सुळगेकर सर उपस्थित होते. त्यांनी औषधनिर्माणशास्त्रयाची जबाबदारी काय असते नक्की याचे मार्गदर्शन नवख्या विध्यार्थ्यांना केले. तसेच 'आम्ही बी-घडलो तुम्ही बी-घडा' या वाक्यावरून बौद्धिक पातळी कशी उंचावेल याचे मार्गदर्शन केले. 'ज्ञान आणि शहाणपण' हे संस्कार फार महत्वाचे  कसे आहे तयाची जाणीव करून दिली. तसेच हे नवखे विध्यार्थी इथून बाहेर पडल्यावर समाज्याला योग्य वळण देण्यासाठी नक्की धडपड करतील हे आस्वासन सरांनी विद्यार्थ्यांकडून घेतले.तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर वाय पाटील सर यांनी शाळेच्या जीवनातून कॉलेज जीवनात प्रथम पाऊल टाकलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्याशी हितगुज केले. सरांनी 'कॉलेज लाइफ इज अ गोल्डन लाइफ' हा संदेश नवख्या विद्यार्थाना दिला. याच जीवनात मैत्रीचे समीकरण कसे असावे हे पटवून देताना उज्ज्वल भविष्यासाठी पुस्तकांशी मैत्री करा हा बोध दिला. आपल्या महाविद्यालयात सर्वांगीण विकास कसा होतो आणि त्या काळात आपण आपला आदर्श निवडणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. हे सगळे करत असताना स्वतःची 'गीता' तयार होईल असे वळण स्वतःला द्या हा संदेश सरांनी दिला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी नवख्या विद्यार्थ्यांसाठी स्वागतगीत गाऊन आपुलकीचे नाते निर्माण केले. या कार्यक्रमात सिनिअर्स विद्यार्थ्यांनी प्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी गेम्स अरेंज करून त्यांचे उत्साहात स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा.वैभव शिळीमकर व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.अमोल काळे यांनी केले होते. तसेच सूत्रसंचालन प्रा.जयश्री जगताप यांनी केले. आभार महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.राजश्री चव्हाण यांनी केले.

Post a Comment

 
Top