0
सासवड ( प्रतिनिधी ) -  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माणशास्र महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्याथी व पालकांकरिता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. विदयार्थी हा उद्याचा नागरिक आहे. हे विद्यार्थी ज्या ठिकाणी घडतात तेथे विदयार्थी, शिक्षक व पालक यांच्यामधील संवाद हि काळाची गरज आहे. औषधनिर्माणशास्र शाखेमध्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबर स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा नाव लौकिक वाढवावा व या आधुनिक काळामध्ये विविध प्रलोभनांपासून तसेच टीव्ही, मोबाईल इद्यादीच्या अतिरिक्त वापरापासून दूर राहून वस्तुनिष्ठ ज्ञान घेण्यासाठी सतत प्रयत्न्यशील राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.डॉ.चंद्रकांत कुंजीर -  सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे यांनी केले. तसेच महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ.आर.वाय.पाटील यांनी महाविद्यालय व संस्था याबाबत माहिती देताना महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आपल्या देशात व परदेशात उच्च पदावर कार्यरत असल्याचे सांगून प्रवेशी विद्यार्थी सुद्धा त्या दृटीने प्रयत्न्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच  विद्याथ्यांच्या सर्वागीण विकासाकरिता महाविद्यालयातील प्रत्येक घटक सतत प्रयत्न्यशील राहील असे आपल्या मार्गदर्शन पार भाषणात नमूद केले. सदर कार्यक्रमाद्वारे अंतिम वर्षाचे विद्यार्थी नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालकांकरिता प्रयोगशाळामधील विविध प्रकारची प्रात्यक्षिक सदर करून अभ्यासक्रमाबद्दल माहिती दिली.  सदर कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणावर विद्याथी, पालक व महाविद्यालयीन विभागप्रमुख व  सेवक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी कल्याण मंडळ अधिकारी प्रा.वैभव शिळीमकर व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.अमोल काळे यांनी केले होते. तसेच सूत्रसंचालन प्रा.जयश्री जगताप यांनी केले. आभार महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.राजश्री चव्हाण यांनी केले.

Post a Comment

 
Top